बाल्टिमोर : जगभरात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत आहे. अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कॅनडा, मेक्सिको या देशांतही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. अमेरिकेत कोरोनामुळे जगात सर्वाधिक मृत्यू झाले असून सोमवारी मृतांचा आकडा 5 लाखांच्यावर पोहोचला. दरम्यान, या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिकेच्यावतीने राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच दिवस राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवून दुखवटा पाळण्यात येणार आहे. व्हाइट हाउसने सोमवारी याबाबती माहिती दिली होती. (United States COVID-19 death toll crosses 500,000 mark)
अमेरिकेत कोविडच्या संसर्गामुळे मृत्यूची संख्या पाच लाखांच्या पुढे गेली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या (Johns Hopkins University) म्हणण्यानुसार देशात संसर्ग होण्याची एकूण 28,184,218 प्रकरणे आहेत आणि मृत्यूची संख्या 500,172 इतकी आहे. अमेरिकेतील कोविड-19च्या मृतांची संख्या वाढताना दिसून येत आहे. दुसऱ्या महायुद्धात कोरिया आणि व्हिएतनाम या सर्वांचे एकत्रितपणे मारे गेलेल्या लोकांपेक्षा अमेरिकेतील मृत्यूचा आकडा जास्त असल्याचे पुढे आले आहे. सोमवारी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) नोंदवल्याप्रमाणे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा मोठा आहे. अमेरिकेत आतापर्यंत जगात सर्वाधिक नोंदविला गेलेला मृत्यूचा हा आकडा आहे. मृत्यू संख्येत लक्षणीयरीत्या वाढ होताना दिसत आहे.
कोरोनाचा उद्रेक आधीपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये सरासरी दैनंदिन मृत्यू आणि घटनांमध्ये घट झाली आहे, परंतु तज्ज्ञांनी चेतावणी दिली आहे की, कोरोनाच्या धोकादायक स्थितीमुळे याचे वाईट परिमाण दिसू शकतात. दरम्यान, अमेरिकेत कोरोनाचा धोका जास्त असल्याने कोरोना व्हॅक्सिन देण्यात आले. मात्र, त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकन लोकांना अद्याप कोरोनाची लस देऊनही जास्त फरक पडलेला नाही.
अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे पहिला मृत्यू फेब्रुवारी 2020 च्या सुरुवातीला झाली. चार महिन्यांत100,000 लोकांचे मृत्यू झाले. सप्टेंबरमध्ये 200,000 आणि डिसेंबरमध्ये 300,000 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर 300,000 ते 400,000 लोकांचा मृत्यू होण्यास एक महिन्याचा कालावधी लागला आणि 400,000 वरुन 500,000 च्या पर्यंत पोहोचण्यास जवळपास दोन महिने लागले. दुसर्या महायुद्धात अंदाजे 405,000 मृत्यू झाला होता. व्हिएतनाम युद्धात 58,000 आणि कोरियन युद्धात 36,000 लोकांची नोंद केली होती.