मोठे टेन्शन गेले, चीनचे भरकटलेले रॉकेट 'या' ठिकाणी कोसळले

कोविड संकटानंतर आणखी एका मोठ्या संकटाची भीती वर्तविण्यात येत होती. चीनचे भरकटलेले रॉकेट  (China Rocket) कोसळून मोठी आपत्ती येण्याची भीती वर्तविली गेली होती. 

Updated: May 10, 2021, 03:31 PM IST
मोठे टेन्शन गेले, चीनचे भरकटलेले रॉकेट 'या' ठिकाणी कोसळले title=
Pic / Reuters

मुंबई : कोविड संकटानंतर आणखी एका मोठ्या संकटाची भीती वर्तविण्यात येत होती. चीनचे भरकटलेले रॉकेट  (China Rocket) कोसळून मोठी आपत्ती येण्याची भीती वर्तविली गेली होती. चीनचे नियंत्रण सुटलेले रॉकेट पृथ्वीवरील मानवी वस्तीवर कोसळणार असल्याचे नाशाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले होते. मात्र, सुदैवाने चीनचे नियंत्रण सुटलेले हे रॉकेट हिंदी महागासागत कोसळले. त्यामुळे अनेक देशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.  श्रीलंकेच्या मालदीवजवळ अनियंत्रित चायनीज रॉकेटचा ढिगारा कोसळला.

 सध्या रॉकेटचा (China Rocket News Update)ढिगारा कोसळल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची कोणतीही बातमी नाही. 2021-035B नावाचे रॉकेट 100 फूट लांब आणि 16 फूट रुंद होते. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर त्यातील एक मोठा भाग जळून खाक झाला आणि उर्वरित भाग पाण्यात पडला. चीनच्या 'मानवयुक्त अंतराळ अभियांत्रिकी' कार्यालयाने म्हटले आहे की बीजिंगच्या वेळेनुसाार सकाळी 10:24 वाजता चीनच्या लाँग मार्च 5 बी रॉकेटचा ढिगारा पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा आला होता. त्यानंतर तो 72.47 डिग्री पूर्वेला रेखांश आणि 2.65 डिग्री उत्तर अक्षांश येथे ओपन समुद्री भागात कोसळला. 

अखेरीस हिंद महासागरात चीनच्या अनियंत्रित रॉकेटचा विनाश झाला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या पेंटागॉनने काही दिवसांपूर्वी असा इशारा दिला होता की चीनचे हे लाँग मार्च 5 बी रॉकेट पृथ्वीवर कोसळेल. अमेरिकन अंतराळ दलाच्या आकडेवारीनुसार हे रॉकेट ताशी 18 हजार मैलांच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने जात होते. इतक्या जास्त वेगामुळे त्याचे लँडिंग कोठे होईल याची पुष्टी करणे शक्य नाही. चिनी माध्यमांनी म्हटले आहे की ते भारताच्या दक्षिणपूर्व भागात श्रीलंका आणि मालदीवच्या आसपास कुठेही पाण्यात पडले आहे.

नुकसान झाल्याचे वृत्त नाही

अनियंत्रित रॉकेटचा ढिगारा कोसळल्याने झालेल्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. 2021-035 बी नावाचे हे रॉकेट 100 फूट लांब आणि 16 फूट रुंद होते. वातावरणात प्रवेश केल्यानंतर त्यातील एक मोठा भाग जळून खाक झाला आणि उर्वरित भाग पाण्यात पडला. यापूर्वी दक्षिण-पूर्व अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, कॅरिबियन, पेरू, इक्वाडोर कोलंबिया, व्हेनेझुएला, दक्षिण युरोप, उत्तर किंवा मध्य आफ्रिका, मध्य पूर्व, दक्षिण भारत किंवा ऑस्ट्रेलिया या भागात कोसळण्याची भीती होती, तसा अंदाज वर्तविला जात होता. जरी पूर्वी बीजिंग, माद्रिद किंवा न्यूयॉर्कमध्ये पडण्याची भीती होती, परंतु वेग जास्त असल्यामुळे नंतर लँडिंगच्या जागेची पुष्टी करणे कठीण झाले.

पाण्यातच पडण्याची शक्यता होती

या रॉकेटच्या लँडिंगच्या वेळी, तो पाण्यातच पडण्याची शक्यता जास्त होती. पृथ्वीवरील बहुतेक भागांवर पाणी असल्यामुळे ते जमिनीवर पडण्याची आणि मानवांचे नुकसान होण्याची शक्यता फारच कमी होती. हे रॉकेट अनियंत्रित झाल्यानंतर पृथ्वीच्या दिशेने जाऊ लागले आणि पृथ्वीवर आदळण्याची भीती वाटू लागली. तथापि, तज्ज्ञांनी असे म्हटले होते की पृथ्वीच्या जवळ येताच रॉकेटचा एक मोठा भाग जाळून राख होईल.