युक्रेन : रशियाने युक्रेनवरती हल्ला केल्यानंतर तेथील परिस्थिती खूपच बिघडली आहे. तेथील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम येथील आर्मी करत आहे. तसेच युक्रेनची आर्मी रशियाच्या सैनिकांना उत्तर देण्यासाठी देखील तयार झाली आहे. युक्रेन आणि रशियामध्ये काय सुरु आहे, यावर संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. या सगळ्या परिस्थीतीचे देखील व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यातील दोन व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
एकिकडे सोशल मीडियावर युक्रेनमधील एक कारला रशियाच्या टँकरने ने चिरडल्याचे दृश्य व्हायरल होत आहे, तर दुसरीकडे युक्रेनमधील एका शुर महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर जगात सगळ्याच ठिकाणाहून या महिलेचं कौतुक होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत सशस्त्र रशियन सैनिकाशी एक युक्रेनची महिला वाद घातताना आणि धाडसाने सामोरं जाताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही युक्रेनमधील महिला कशी धाडसाने रशियाच्या सैन्यातील एका व्यक्तीसमोर उभे राहून त्याला ऐकवत आहे. हा व्हिडीओ UkraineWorld नावाच्या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला.
हा व्हिडीओ शेअर करताना त्यावर ही महिला त्या रशियन सैनाला काय म्हणत आहे हे कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. (क्लिपमधील महिला कथितपणे सैनिकांना विचारताना दिसत आहे) "तुम्ही आमच्या देशात का आला? या बिया घ्या आणि तुमच्या खिशात ठेवा. म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर तेथे सुर्यफुलं उमलतील."
Ukrainian woman confronts Russian soldiers in Henychesk, Kherson region. Asks them why they came to our land and urges to put sunflower seeds in their pockets [so that flowers would grow when they die on the Ukrainian land] pic.twitter.com/ztTx2qK7kB
— UkraineWorld (@ukraine_world) February 24, 2022
सुर्यफुल हे युक्रेनचे राष्ट्रीय फुल आहे. त्यामुळे या माहिलेनं या फुलांच्या बिया ठेवण्याचा सल्ला दिला.
समोर मृत्यू उभा असताना या महिलेनं, ज्या पद्धतीनं या रशियाच्या सैनिकाला सुनावलं आहे, त्याला तोड नाही. या घटनेमुळे या महिलेच्या शैर्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
सध्याची युक्रेनमधील परिस्थिती पाहाता येथील येणारे दिवस आणि रात्र कदाचित लांब आणि कठीण असणार आहेत. पण या महिलेनं दाखवलेल्या शैर्यासमोर, #पुतिन देखील काही काळ विचारात पडेल हे नक्की.