लंडन : ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे भारताशी फार जवळचे नाते आहे. ते भारताचे जावई आहेत. त्यांनी भारतीय वंशाच्या मारिया विलर हिच्याशी १९९३ या साली विवाह केला होता. मारिया ही प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग यांची पुतणी आहेत. बेरिस यांच्याबरोबर २५ वर्ष एकत्र राहिल्यानंतर गेल्यावर्षी ते विभक्त झाले होते.
मात्र, बोरिस अनेकदा भारतात येऊन गेले होते. बोरिस यांनी अनेकवेळा भारताचे जावई असल्याचे म्हटले आहे. मारियाच्या आई दीप सिंगने बीबीसीचे प्रसिध्द पत्रकार चार्ल्स विलर यांच्याशी विवाह केला होता. मात्र, त्यांचे देखील नात फार काळ टिकले नाही. २००८ साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर दीप यांनी खुशवंत सिंग यांच्या धाकट्या भावाशी लग्न केले.
मारिया आणि बोरिस यांनी एकूण चार मुले आहेत. बेरिस आणि त्यांची पत्नी मारिया गेल्यावर्षी रणथंबोर अभयारण्य पाहण्यासाठी भारतात आले होते, अशी माहिती खुशवंत सिंग यांचे पुत्र राहुल सिंग यांनी दिली.
कंझर्वेटीव्ह पार्टीच्या नेतेपदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. १ लाख ६० हजार कार्यकर्त्यांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान केले. या निवडणुकीत विजय मिळवत बोरिस पंतप्रधानपदी विराजमान झाले.
यानंतर बेरिस यांनी भारतीय समर्थकांशी संवाद साधताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांचे फार चांगले संबंध आहेत. भारत आणि ब्रिटन जगातील मोठे प्रजासत्ताक देश असून त्यांनी एकत्र येऊन व्यापार आणि आर्थिक भरभराट होण्यासाठी त्यांनी एकत्र काम करायला हवे असे सांगितले म्हटले होते.