सोशल मीडियावरील चॅलेंज महागात; गोम, पाल खाल्ली आणि....

चीनमध्ये कुत्रे, मांजर, साप आणि किडे असे अन्नपदार्थ खाल्ले जातात. यात फारसं काही नवीन नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Updated: Jul 25, 2019, 09:02 PM IST
सोशल मीडियावरील चॅलेंज महागात; गोम, पाल खाल्ली आणि.... title=

मुंबई : चीनमध्ये कुत्रे, मांजर, साप आणि किडे असे अन्नपदार्थ खाल्ले जातात. यात फारसं काही नवीन नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती अळ्या विषारी गोम आणि पाल खाताना लाईव्ह दिसत आहे. लाईव्ह व्हिडिओ दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. 

या तरुणाचे नाव सन असून हा तरुण ३५ वर्ष आहे. चीनमध्ये तरुणाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याची बातमी नाईन जीएजी या वेबसाईटने दिली आहे.  

सोशल मीडियावर चॅलेंजचा एक भाग म्हणून सन नावाच्या एका तरुणाने ‘डूयू’ या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरुन दारुच्या नशेत असताना,  गोम आणि पाल खाण्याचा व्हिडिओ त्याच्या १५  हजार फॉलोअर्ससाठी लाईव्ह टेलिकास्ट करत होता. 

व्हिडिओमध्ये सनच्या मागे एक गोलाकार चार्ट दिसतोय. त्यात चार्टला फिरवून बाणासमोर ज्या गोष्टीचे नाव समोर येत होते तो ती, गोष्ट सन खात होता. 

गोलाकार चार्टवर पाल, विषारी गोम, दारु, कच्ची अंडी आणि व्हिनेगर अशा अनेक गोष्टींची नावे लिहिली होती. तिथल्या स्थानिक वृत्तवाहिनी झियान न्यूजने या घटनेविषयीची माहिती दिली. 

व्हिडिेओ चालू असताना सन अचानकपणे खाली पडला, तरीही लाइव्ह वेबकास्ट सुरुच होते. सन हा चीनमधील हेईफीई शहरामध्ये राहत होता. जेव्हा सनची प्रेयसी त्याच्या घरी पोहचली.

तेव्हा सन हा वेबकॅमसमोर खाली बेशुद्धावस्थेत पडलेला होता. त्यानंतर सनच्या प्रेयसीने पोलिसांना बोलविले आणि पोलिसांचा पंचानामा होतपर्यंत हा व्हिडिओ सुरुच होता. सनच्या प्रेयसीने तातडीने जवळच्या रुग्णालयात सनला दाखल केले, मात्र त्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

अनेक तरुण तरुणी सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ अपलोड करून प्रसिद्धी सध्या मिळवतांना दिसतात. पुष्कळ वेळेस हा चॅलेंज तरुणाना महागात पडतांना दिसतो. यापूर्वी देखील अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, मग रेल्वेवर स्टन्टस असो वा, किक चॅलेंज... 

सनचा हा व्हिडिओ चीनमध्ये युट्यूबऐवजी वापरण्यात येणाऱ्या ‘डूयू’वरुन सध्या काढून टाकण्यात आला आहे. सध्या चीनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी खाण्याचे चॅलेंज सुरू आहेत.