कॅब सर्व्हिस 'उबेर'चा परवाना झाला रद्द

प्रवाशांना कॅब सर्व्हिस देणारी कंपनी 'उबेर'चा परवाना लंडनमध्ये रद्द करण्यात आलाय. 

Updated: Sep 23, 2017, 11:29 AM IST
कॅब सर्व्हिस 'उबेर'चा परवाना झाला रद्द  title=

लंडन : प्रवाशांना कॅब सर्व्हिस देणारी कंपनी 'उबेर'चा परवाना लंडनमध्ये रद्द करण्यात आलाय. 

कंपनीच्या संचालकांची भूमिका आणि वर्तणुकीत गंभीररित्या जबाबदाऱ्यांचा अभाव असल्याचं कारण देत कंपनीचा परवानाच रद्द करण्यात आलाय. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये उबेरचा परवाना ३० सप्टेंबर रोजी संपतोय. यानंतर या परवान्याचं नुतनीकरण केलं जाणार नाही. 

ट्रान्सपोर्ट फॉर लंडन (TFL)च्या म्हणण्यानुसार, लंडनच्या रस्त्यांवर 'उबेर' योग्य परिवहन कंपनी नाही... यामुळे या कंपनीला परवाना देणं योग्य ठरणार नाही. 

अनेकदा गंभीर गुन्ह्यांची सूचना देऊनही उबेरच्या सुविधेमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने बदल झाला नाही... त्यामुळे कंपनीवर ही कारवाई करण्यात आलीय. 

'उबेर'च्या म्हणण्यानुसार, या निर्णयाला ते कोर्टात आव्हान देणार आहे. जवळपास ३५ लाख लंडन रहिवासी आपल्या अॅपचा वापर करत असल्याचा तसंच जवळपास ४० हजार चालक आपला चरितार्थ चालवण्यासाठी कंपनीवर अवलंबून असल्याचा दावा 'उबेर'नं केलाय.