Viral: भूकंपानं जीव घेतला... अंत्यसंस्कारासाठी चितेवर झोपवलं अन् त्यानं खाडकन डोळे उघडले; वाचा नक्की काय घडलं?

Man Got Alive After Death in Turkey-Syria Earthquake: त्याचा मृतदेह जेव्हा ढिगाऱ्या खालून (Man Got Alive in Turkey-Syria) काढण्यात आला तेव्हा त्याची ओळख पटवण्यासाठीचे काम सुरू केले होते. कुटुंबियांचा शोध घेईपर्यंत त्याला कोल्ड स्टोरेजमध्येही ठेवण्यात आले होते. 

Updated: Feb 23, 2023, 05:43 PM IST
Viral: भूकंपानं जीव घेतला... अंत्यसंस्कारासाठी चितेवर झोपवलं अन् त्यानं खाडकन डोळे उघडले; वाचा नक्की काय घडलं?  title=

Man Got Alive After Death in Turkey-Syria Earthquake: काही दिवसांपुर्वी तुर्कस्तानमध्ये झालेल्या भुकंपानं अक्षरक्ष: सर्वांनाच हादरा दिला आहे. फेब्रुवारी महिन्यात आलेल्या या जोरदार भुकंपानं फक्त तुर्कस्तान आणि सीरियालाच (Turkey-Syria Earthquake) नाही तर अख्ख्या जगाला हादरवून सोडले आहे. तुर्कस्तानच्या भागात आत्तापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही या भागात भुकंपावर भुकंप येत आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. सध्या या घटनेनं अनेक कुटुंबीय उद्धवस्त झाली असून आपल्या प्रियजननांनाही (Turkey-Syria People Death) अनेकांनी गमावले आहे. या प्रकाराचा धक्का खूप जणांना बसला आहे. त्याचबरोबर जगातील वेगवेगळ्या ठिकाणाहून तुर्कस्तानाला मदतीचा हात मिळतो आहे त्याचबरोबर भारतानंही तुर्कस्तानला मदतीचा हात पुढे दिला आहे. (Turkey-Syria Earthquake a man got suddenly alive after declaring dead viral news in marathi)

येथील लोकांच्या एक नाही तर हजार हृदयद्गावक कहाण्या आहेत. अशाच काही लोकांचे धक्कादायक अनुभव ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सध्या असाच एक प्रकार तुर्कस्तानमध्ये (Viral News) घडला आहे. येथे भुकंपामुळे ढिगाऱ्याखाली दाबून गेल्यामुळे एका माणसाला मृत घोषित करण्यात आले होते परंतु तो पुन्हा जिवंत झाल्यानं सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. 

डेली स्टार न्यूज वेबसाईटच्या वृत्तानुसार, सीरिया येथील रहिवासी अहमद अल-मगरीबी हा अतारिब शहरात राहत होता. या भागात जेव्हा भूकंप आला होता तेव्हा अहमद याचा मृत्यू झाला होता. तो बरेच दिवस ढिगाऱ्यात अडकला होता त्यामुळे जेव्हा त्याला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले तेव्हा त्याला मृत घोषित करण्यात आले होते. त्याचा मृतदेह जेव्हा ढिगाऱ्या खालून (Man Got Alive in Turkey-Syria) काढण्यात आला तेव्हा त्याची ओळख पटवण्यासाठीचे काम सुरू केले होते. कुटुंबियांचा शोध घेईपर्यंत त्याला कोल्ड स्टोरेजमध्येही ठेवण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याची ओळख पटली आणि तेव्हा त्याचे नाव अहमद अल - मगरीबी असल्याचे समजले. 

आणि तो जिवंत झाला! 

कुटुंबियांनी रूग्णालायातून त्याचा अहमद अल -मगरीबीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी म्हणून त्याला कुटुंबियांनी स्मशानभुमीवर नेले. मात्र तिथे गेल्यावर विचित्र प्रकार घडला. तो पाहून त्यांच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या शरीराची हालचाल सुरू झाली आणि त्याच्या हृदयाचे ठोकेही सुरू झाले. त्याचबरोबर त्याची प्रकृती तपासण्यासाठी त्याला पुन्हा रूग्णालयात नेले तेव्हा घडला प्रकार पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. तेव्हा अहमद हा अशा एका लोकांपैकी एक आहे ज्याचे हृदय बंद पडल्यानंतरही पुन्हा सुरू झाले आहे. 

तुर्कस्तानमध्ये अजूनही युद्ध सुरूच! 

आत्तापर्यंत तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भुकंप झाल्यानं हजारो लोकं मृत्यूमुखी पडले आहेत. 6 फेब्रुवारी 2023 रोजी या भागात 7.8 रिश्टर स्केलचा भुकंप झाला होता अद्यापही या भागात भुकंपाचे धक्के पोहचत आहेत.