Operation Dost: 6 तासात रूग्णालय उभारलं, 3600 रूणांवर उपचार, तुर्कीतील नागरीकांकडून भारतीय लष्कराचे तोंडभरून कौतूक

Operation Dost: तुर्कीत (turkey earthquake)आलेल्या भूकंपाने सगळचं नष्ट केले आहे. आतापर्यंत या भूकंपात 45000 पेक्षा नागरीक मृत्यूमूखी पडले आहेत. जखमींचा आकडा तर त्याहून दुप्पट आहे. या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताकडून ऑपरेशन दोस्त (Operation Dost) ही मोहिम राबवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत भूकंपग्रस्त तुर्की नागरीकांना हवी तशी मदत केली जात आहे.

Updated: Feb 21, 2023, 09:47 PM IST
Operation Dost: 6 तासात रूग्णालय उभारलं, 3600 रूणांवर उपचार, तुर्कीतील नागरीकांकडून भारतीय लष्कराचे तोंडभरून कौतूक  title=

Operation Dost: तुर्कीत (turkey earthquake)आलेल्या भूकंपाने सगळचं नष्ट केले आहे. आतापर्यंत या भूकंपात 45000 पेक्षा नागरीक मृत्यूमूखी पडले आहेत. जखमींचा आकडा तर त्याहून दुप्पट आहे. या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताकडून ऑपरेशन दोस्त (Operation Dost) ही मोहिम राबवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत भूकंपग्रस्त तुर्की नागरीकांना हवी तशी मदत केली जात आहे. त्यामुळे तुर्कीतील नागरीक भारतीय लष्कराचे (Indian army) कौतूक करत आहेत. (turkey earthquake turkish citizen expressing their gratitude army chief general manoj pandey operation dost ) 

रूग्णांवर यशस्वी उपचार 

भारतीय लष्कराने (Indian army) तुर्कीमध्ये सुमारे 3600 रुग्णांवर यशस्वी उपचार केले असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (Indian Army Chief Gen Manoj Pande) यांनी दिली आहे.त्यामुळेच तुर्कस्तानचे नागरिक यासाठी मेसेज पाठवून कृतज्ञता व्यक्त करत आहेत.  भारतीय लष्कराने त्यांना अशा वेळी मदत केली जेव्हा त्यांना खरोखरच गरज होती, असे तुर्कस्तानच्या रुग्णांचे म्हणणे आहे. 

6 तासात उभं केलं रूग्णालय

तुर्कस्तानमध्ये (turkey earthquake) केवळ 6 तासांच्या अल्प सूचनेवर रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रूग्णालयात 300 खाटा आहेत. हे फील्ड हॉस्पिटल 14 दिवस चालले. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर तैनात करण्यात आले होते. या तज्ज्ञ डॉक्टरांनी 3600 रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहे. या कामगिरीनंतर लष्करप्रमुखांनी भारतीय लष्कराच्या 60 पॅरा फील्ड या वैद्यकीय पथकाचा सत्कार केला. तुर्कस्तानमध्ये मदत पुरवल्यानंतर आता जवान मायदेशी परतले आहेत. 

तुर्कस्तानमध्ये (turkey earthquake) झालेल्या भीषण भूकंपात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर भारताने तुर्कीसाठी मदतीचा हात पुढे केला होता. भारताकडून मदतीसाठी वेगवेगळी पथके पाठवण्यात आली होती. यामध्ये एनडीआरएफच्या जवानांचे पथकही बचाव कार्यासाठी तुर्कीला गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तुर्कीहून परतलेल्या NDRF जवानांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले होते.

दरम्यान भारताने भूकंपग्रस्त (turkey earthquake) तुर्कीमध्ये राबवलेल्या ऑपरेशन दोस्तचे कौतुक केले जात आहे. तुर्कस्तानमध्ये भारतीय लष्कराने ज्या प्रकारे तत्परतेने मदत उपलब्ध करून दिली, त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.