Chinese Billionaires: चीनमध्ये सध्या हायप्रोफायल उद्योगपती एकामागोमाग एक गायब (Chinese Billionaires missing) होत असल्याने खळबळ उडाली आहे. नुकतेच इन्व्हेस्टमेंट बँकर बाओ फॅन (Bao Fan) बेपत्ता झाले. बाओ हे चीन रेनसॉ होल्डिंग्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. कंपनीने बाओ यांच्या बेपत्ना होण्याला दुजोरा दिला आहे. रेनसॉ कंपनीने 16 फेब्रुवारी 2023 ला दिलेल्या माहितीनुसार अध्यक्ष बाओ यांच्या दोन दिवसांपासून कोणताही संपर्क झालेला नाही. 2021 वर्षाच्या अखेरपासून चीनमध्ये भ्रष्टाचार विरोधी विभागाची कारवाई सुरु आहे, अशा काळातच बाओ गायब झाल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हायप्रोफाईल उद्योगपती गायब
चीनमध्ये अरबपती गायब होण्याची प्रकरण थांबत नाहीएत. 2 वर्षांपूर्वी अलीबाबाचे (Alibaba) फाऊंडर जॅक मा (Jack Ma) यांच्याबरोबर असाच प्रकार घडला होता. याआधीही चीनमधून काही उद्योगपती गायब झाले आहेत. या उद्योगपतींच्या गायब होण्यामागे चीनमधलं खशी जिनपिंग सरकारचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
एका रिपोर्टनुसार रेनसॉ कंपनीचे एक अधिकारी कोंग लिन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, आणि याप्रकरणी बाओ यांची चौकशी सुरु होती. पण धक्कादायक म्हणजे चीनमध्ये जेव्हा जेव्हा अशा एखाद्या मोठ्या उद्योगपतीची चौकशी होते, तेव्हा तो उद्योगपती गायब झाल्याच्या बातम्या येतात.
गुओ गुआंगचांग
वर्ष 2015 मध्ये फोसुन इंटरनॅशनलचे अध्यक्ष अरबपती गुओ गुआंगचांग असेच अचानक बेपत्ता झाले होते. त्यांना चीनचं वॉरेन बफेट म्हणून ओळखलं जायचं. काही दिवसांनंतर ते अचानक सर्वांसमोर आले. बेपत्ता काळात गुओ यांनी एका सरकारी तपासात (unspecified investigation) अधिकाऱ्यांना मदत केल्याचं बोललं जातंय.
जिओ जियानहुआ
वर्ष 2017 मध्ये चीन-कॅनडाई उद्योगपती जिओ जियानहुआ हे हाँगकाँगमधून गायब झाले. त्यानंतर त्यांना चीनी अधिकाऱ्यांनी अटक केल्याची बातमी आली, त्यानंतर 2022 मध्ये त्यांचावर भ्रष्टाचाराचे आरोप लावत त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. भ्रष्टाचारप्रकरणी जिओ यांना शांघाई कोर्टाने तब्बल 13 वर्षांची शिक्षा सुनावली.
रेन झिकियांग
वर्ष 2020 मध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा जोकर असा उल्लेख केल्याने रेन झिकियांग काही महिन्यांसाठी अचानक गायब झाले. रियल इस्टेट एजंट असलेले रेन झिकियांग यांनी कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याने चीनी सरकारवर टीका केली होती. इतकंच नाही तर त्यांनी चीनी सरकारवर भ्रष्टाचाचारे आरोपही केला. पण त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत 18 वर्षांचा तुरुंगवास झाला.
जॅक मा
चीनची आर्थिक नियामक प्रणाली आणि चीनच्या जिनपिंग सरकारवर टीका केल्यानंतर अलीबाबाचे संस्थापक आणि अब्जाधीश जॅक मा अनेक महिन्यांपासून बेपत्ता आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी शेवटचं ट्विट केल होतं, त्यानंतर 2021 मध्ये त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. कोरोना महामारी संपल्यानंतर आपण पुन्हा भेटू असं या व्हिडिओ जॅक मा म्हणताना दिसले होते.
क्यू देजुन
10 फेब्रुवारी 2023 मध्ये सीजेन ग्रुपचे अध्यक्ष क्यू देजुन गायब झाल्याची बातमी आली. याबद्दल जास्त माहिती देण्यात आलेली नाही.
चीनमध्ये का गायब होतायत अरबपती?
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 2012 मध्ये चीनच्या सत्तेवर आले. त्यानतंर त्यांनी सुरु केलेल्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेमुळे संपूर्ण चीनमध्ये खळबळ उडाली आहे. या मोहिमेत आतापर्यंत लाखो लोकांची चौकशी करण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे. यात बडे व्यापारी, लष्कराचे जवान आणि अनेक सरकारी विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिक्षा झाली आहे. चीनमधले अब्जाधीश उद्योगपतीही सरकारच्या भीतीने लपून बसल्याचं मानले जातं आहे.
चीनने 2017 पर्यंत 2,10,000 अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांतर्गत शिक्षा करण्यात आली होती. केंद्रीय शिस्त तपासणी आयोगाने (CCDI) दिलेल्या माहितीनुसार भ्रष्टाचार विरोधी संस्थेला यावर्षी 1.31 दशलक्ष तक्रारी प्राप्त झाल्या आणि 2,60,000 प्रकरणे उघड झाली आहेत. त्याचवेळी, चीनची वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार शी जिनपिंग यांच्या पक्षाने आचारसंहितेचे उल्लंघन आणि इतर गुन्ह्यांसाठी 4,15,000 लोकांना शिक्षा केली आहे.