धक्कादायक! भरसंसदेत खासदार महिलेच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल

चर्चा सुरू असताना अचानक खासदार आपल्या जागेवरुन उठला आणि एका महिला खासदाराच्या त्याने कानशिलात लगावली. 

Updated: Jul 5, 2021, 04:35 PM IST
धक्कादायक! भरसंसदेत खासदार महिलेच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल title=

ट्यूनिशिया: संसदेत घामासान झाल्याचे तुम्ही ऐकलं असेल इतकच नाही तर आंदोलन नारे लावल्याचं पाहिलं आहे. पण चक्क भरसंसदेत महिला खासदाराला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ट्युनिशियाच्या संसदेतील मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

हा व्हिडिओ संसदेत सुरू असलेल्या चर्चे दरम्यानचा असल्याचं दिसत आहे. चर्चा सुरू असताना अचानक खासदार आपल्या जागेवरुन उठला आणि एका महिला खासदाराच्या त्याने कानशिलात लगावली. साहबी समरा असं मारहाण करणाऱ्या खासदाराचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे. त्याने महिलेला कानशिलात लगावल्य़ानंतर इतर खासदारांनी साहबी यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा राग अनावर झाला आणि त्याने खासदार महिलेला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

नेमकं काय आहे प्रकरण?

महिला खासदार अबीर माउसी या संसदेत ट्यूनिशिया सरकार आणि कतर फंड फॉर डेवलपमेंट यांच्यात सुरू असलेल्या करारावर विरोध करत होती. त्याचवेळी चिडलेले खासदार साहबी समरा यांनी या महिलेच्या कानशिलात लगावली. हा सगळा गोंधळ सुरू असताना इतर खासदारांना या प्रकरणात मध्यस्ती करावी लागली.

फ्री डेस्टोरियन पार्टीच्या लीडर अबीर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की हा त्यांचा खरा चेहरा आहे. जो सर्वांसमोर आला. हिंसा आणि महिलांचा अपमान करणं त्यांना बदनाम करून नियमांचं उल्लंघन करणं हे खूप चांगलं जमतं असंही त्या यावेळी फेसबुक पोस्टमध्ये म्हणाल्या.