तुम्ही जर सायकल चालवताना असं काही करत असाल तर सावधान... या तरुणासोबत काय घडलं पाहा Video

अतिशय भयानक आणि खतरनाक स्टंट हे तरुण करतात. 

Updated: Aug 14, 2022, 03:51 PM IST
तुम्ही जर सायकल चालवताना असं काही करत असाल तर सावधान... या तरुणासोबत काय घडलं पाहा Video title=
trending video shocking stunt video viral on social media in marathi

Trending Video : आजकालच्या तरुणांना सोशल मीडियाने वेड लावलं आहे असंच म्हणायला हवं. मुलांच्या हातात महागाचे मोबाईल फोन आल्यामुळे मुलं सतत मोबाईलमध्ये घुसलेली दिसतात. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी मुलं आपल्या जिवाची परवादेखील करत नाही. 

खतरनाक स्टंट करुन तरुण पिढी युजर्सचं लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर आपल्याला असे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात.अतिशय भयानक आणि खतरनाक स्टंट हे तरुण करतात. काही स्टंट हे कौतुकास्पद असतात. मात्र काही स्टंट करताना तरुण स्वत:लाच नुकसान पोहोचून घेतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो बघू त्या तरुणावर दया पण येते आणि हसायला पण येतं. (trending video shocking stunt video viral on social media in marathi)

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता एक तरुण रस्तावरुन सायकल चालवत होता. समोरुन एक कार येते आणि तो स्टंट करायला जातो. मात्र त्याचं गणित चुकतं आणि तो जोरदार गाडीला जाऊन धडकतो. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता तो तरुण स्टंट करताना आपल्या जीवाशी खेळ करताना दिसून येत आहे. हा स्टंट करताना झालेल्या अपघातात तो थोडक्यात बचावला आहे. 

हा व्हिडीओ ट्विटरवर 1000 ways to die या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत 2 लाख व्यूज मिळाले आहेत. तर 3500 यूजर्सने हा व्हिडीओ लाइक केला आहे.