Viral Video : पैशांचा डोंगर! कर्मचाऱ्यांना दिले 70 कोटी रुपये, कोण आहे हा अजुबा?

Viral Video : अबब...प्रत्येक कर्मचाऱ्यांचा हातात पैशांचा डोंगर घेऊन स्टेजवरुन घरी जाताना कर्मचारी दिसतं आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.    

Updated: Jan 31, 2023, 07:04 PM IST
Viral Video : पैशांचा डोंगर! कर्मचाऱ्यांना दिले 70 कोटी रुपये, कोण आहे हा अजुबा? title=
trending Video of a Chinese Corporation which distributed 70 crores in employess went Viral on social media

Mountain of Cash Viral Video : देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के...हेच गाणं सत्यात आलं आहे या व्हायरल व्हिडीओमधील (Viral Video) लोकांचे...हा व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोट चावल्याशिवाय राहणार नाही. नशीब काय असतं ते हा व्हिडीओ पाहून कळतं. आज शहरामध्ये अहोरात्र काम करुन पोटाची आणि आपल्या घरांची काळजी घेण्यासाठी आपण मरमर काम करतो. कारण चार पैसे मिळावे म्हणून...मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी मार्चमध्ये मिळणाऱ्या इन्क्रिमेंटची  (ONLINE INCREMENT CALCULATOR) वाट पाहत असतात. पगार वाढ म्हटले की  कर्मचाऱ्यांना  एक वेगळीच उत्सुकता असते . तर कंपनी आपलाला बोनस देईल, या आशेत ते तासंतास काम करत असतात. पण कोणाच्या पदरात निराशा तर कोणाला बंपर बोनसचं सुख मिळतं. पण या व्हिडीओमधील दृश्य पाहून पैशांचा पाऊस काय असतो ते कळतं. 

अबब..! हातात पैशांचा डोंगर...

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडीओ प्रत्येक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता स्टेजवर पैशांचं मोठं डोंगर दिसतं आहे. हे पैसे कर्मचाऱ्यांना वाटण्यात आले. कर्मचाऱ्यांना इतका बोनस देण्यात आला की ज्याचा कोणीही कधीही विचार केला नसेल. ते पैसे घरी घेऊन जाताना नोटांचे बंडल खाली पडतं होते. (trending Video of a Chinese Corporation which distributed 70 crores in employess went Viral on social media)

स्टेजवरील नोटांचे ढीग दिसत होते. स्टेजवर जवळपास सुमारे दोन मीटर उंडीपर्यंत नोटांचे बंडल मांडले होते. वर्षाअखेरीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पैसांचं वाटप करण्यात आलं. हे घडलं आहे चिनीमध्ये...चिनीमधील हेनानमधील एका क्रेन फर्मने त्यांचा कर्मचाऱ्यांना सुमारे 70 कोटी पैसे बोनस म्हणून दिले. 

कर्मचारी रातोरात्र झाले मालामाल

एका वृत्त आउटलेटनुसार, या कंपनीने तीन सर्वोत्तम-कार्यक्षम विक्री व्यवस्थापकांनासुमारे 6 कोटी रुपयांचं बक्षिक देण्यात आलं. तर 30 हून अधिक लोकांना किमान एक कोटी 20 लाखांचं बोनस देण्यात आलं.