पोटच्या मुलीचा व्हिडीओ LIKE केला म्हणून आईला खावी लागली जेलची हवा

कोणाचाही व्हिडीओ LIKE करताय तर आधी हे वाचा, आईलाच चक्क जावं लागलं तुरुंगात 

Updated: May 20, 2022, 01:28 PM IST
पोटच्या मुलीचा व्हिडीओ LIKE केला म्हणून आईला खावी लागली जेलची हवा title=

कॅरिक : आपण सोशल मीडियावर अगदी अनोळखी लोकांचे व्हिडीओही अगदी सहज लाईक करतो. पण कधीकधी असे प्रकार करणं आपल्याला महागात पडू शकतं. एका आईला तिच्या मुलीचा व्हिडीओ लाईक करणं चांगलंच महागात पडलं. एवढंच नाही तर तिला तुरुंगात जावं लागलं आहे. 

एका महिलेनं आपल्या मुलीचा टिकटॉक व्हिडीओ लाईक करणं अडचणीचं ठरलं. 11 ते 23 महिन्यांपर्यंत त्यांना जेलची हवा खावी लागणार आहे. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया.

wtrf.com ने दिलेल्या रिपोर्टनुसार महिला आणि तिच्या पतीवर दोन मुलांच्या शोषणाचे आरोप आहेत. या आरोपादरम्यान त्यांना एक अट घालण्यात आली होती. दाम्पत्याने मुलांशी कोणताही संपर्क ठेवायचा नाही. या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. 

या महिलेचं नाव ट्रिस्टा प्राइज आहे. या महिलेवर चाइल्ड एब्यूज प्रोबेशनच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. 2020 मध्ये मुलांचं शोषण केल्याचा आरोप आहे. 

कॅरिक (पेनसिल्व्हेनिया) इथे राहणाऱ्या या जोडप्यावर दोन मुलांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आणि वेगवेगळ्या गोष्टींनी त्यांच्यावर अनेकदा हल्ला केल्याचा आरोप आहे. फ्रायपॅननेही हल्ला करण्यात आला होता. त्याचवेळी ट्रिस्टाने ही संपूर्ण घटना पाहिली आणि रेकॉर्ड केल्याचा आरोप करण्यात आला.