Trending Videos: आपण यापूर्वी जगातील अनोखे स्टेशनबद्दल माहिती जाणून घेतली आहे. शिवाय अनेक खास आणि वैशिष्ट्यपूर्ण ट्रेन (train) आणि रेल्वे ट्रॅकबद्दल पण आपण यापूर्वी माहिती पाहिली आहे. पण सोशल मीडियावर (Social Media) सध्या जरा हटके रेल्वे ट्रॅकचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
अच्छा आम्हाला सांगा, तुम्ही जेव्हा कुठल्याही ट्रेनने प्रवास करता, तेव्हा तुमची ट्रेन जंगलातून रस्ता काढत दरी डोंगरातून वाट काढतं बोगद्यातून पुढे जाते. पण सोशल मीडियावर ज्या रेल्वे ट्रॅकचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्या ट्रॅकवरून तुम्ही नक्कीच प्रवास केला नसेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच या रेल्वे ट्रॅकवरुन प्रवास करण्याचा मोह आवरता येणार नाही. (trending news train runs through residential apartments in china shocking video viral on social media in marathi)
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, उंच अशा पुलावरून एक ट्रेन अचानक 6-7 मजली इमारतीत घुसते. होय, ही ट्रेन चक्क इमारतीच्या आतून जाते. या व्हिडीओमधील रेल्वे ट्रॅक चीनमधील चोंगकिंगमधील एका उंच इमारतीतून जातो. या शहराची ओळक माउंट सिटी अशीही आहे. कारण या शहरात गगनचुंबी इमारत आहेत. या गगनचुंबी इमारतीच्या मधून खास रेल्वे ट्रॅक जातो. त्यामुळे या इमारतीतील फ्लॅट्सच्या किमंतीही गगणाला भिडल्या आहेत.
या ट्रॅकची खासियत म्हणजे या ट्रॅकवरून जेव्हा ट्रेन इमारतीत जाते तेव्हा या इमारतीतील लोकांना तिचा आवाजही ऐकू येत नाही. या अनोख्या रेल्वे ट्रॅकचा व्हिडीओ ट्विटरवर @wowinteresting8 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 5 लाख 58 हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर या व्हिडीओला तुफान लाईकही मिळत आहेत.
A train runs through residential apartments in China pic.twitter.com/4n0MhsVOho
— H0W_THlNGS_W0RK (@wowinteresting8) August 14, 2022