प्रेमाला वय नसतं; चक्क डॉक्टरवरच जडला चिमुकल्याचा जीव, केलं असं काही...Video तर पाहा

 मोठी माणसचं प्रेमात पडतात असं नाहीये आता जो व्हिडीओ समोर आलाय तो आहे एका चिमुकल्याचा..एक महिला डॉक्टर त्याचं चेकअप करत असताना हा चिमुकला त्या डॉक्टरच्या चक्क प्रेमात हरवून गेलाय असा हा व्हिडीओ आहे 

Updated: Aug 15, 2022, 12:30 PM IST
 प्रेमाला वय नसतं; चक्क डॉक्टरवरच जडला चिमुकल्याचा जीव, केलं असं काही...Video तर पाहा title=

 Small Baby fall in love with female doctor:प्रेम कधी कोणावर होईल सांगता येत नाही प्रेमाला वायाच बंधनही नसत असं म्हटलं जात आणि याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे खूप लोकांकडून हा व्हिडीओ पहिला जातोय शेअर केला जातोय.तुम्हाला तुमचं प्रेम कधी भेटेल सांगता येत नाही अगदी चालत बोलता कोणीतरी आवडतं आणि आपला जीव एखाद्यावर जडु शकतो. व्यक्तीच्या प्रत्येक एक्सप्रेशनवरून तो आपल्यावर किती प्रेम करतो हे कळतं..पण मोठ्ठी माणसच प्रेमात पडतात असं नाहीये आता जो व्हिडीओ समोर आलाय तो आहे एका चिमुकल्याचा..एक महिला डॉक्टर त्याच चेकअप करत असताना हा चिमुकला त्या डॉक्टरच्या चक्क प्रेमात हरवून गेलाय असा हा व्हिडीओ आहे 

सुरवातीला जेव्हा ही डॉक्टर चिमुकल्याचं चेकअप करत असते तेव्हा तो थोडा गोंधळलेला दिसतोय पण हळूहळू तो अगदी तिच्या प्रेमात पडून एकटक तिच्याकडे पाहत तिच्याच हातावर डोकं टेकवताना दिसलाय. 

आतापर्यंत 40 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय आणि बऱ्याच जणांनी खूप क्युट व्हिडीओ असं म्हणत लाईक देखील केलय.