'टायटॅनिक सिनेमातील तो सीन रिअल लाईफमध्ये! पाहा Viral Video

 'टायटॅनिक'चे सीन रिअल लाईफ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Updated: Aug 16, 2022, 07:35 PM IST
'टायटॅनिक सिनेमातील तो सीन रिअल लाईफमध्ये! पाहा Viral Video title=
trending news titanic movie scene in real life between two frog video viral on social media in marathi

Viral Video  - तुम्हाला हॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'टायटॅनिक' आठवतो ना. जगातील पहिलं सर्वात मोठं जहाज बुडायलं होतं. यावर हा चित्रपट बनविण्यात आला होता. लिओनार्डो डिकॅप्रियो आणि केट विन्सलेट यांची मुख्य भूमिका होता. तुम्हाला 'टायटॅनिक'चा शेवटचा सीन आठवत असेल जेव्हा अभिनेत्री समुद्रात एका तुकड्याच्या आधार घेते आणि तिचा जीव वाचतो. पण या अभिनेता पाण्यात बुडून मरण पावतो. 

आता तुम्ही म्हणाल की, या सीनची आज अचानक आठवण का झाली? तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 'टायटॅनिक'चे सीन रिअल लाईफ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच 'टायटॅनिक'च्या या सीनची आठवण होईल. (trending news titanic movie scene in real life between two frog video viral on social media in marathi)

या व्हिडीओमधील गंमतीशीर भाग म्हणजे यात तरुण-तरुणी नाही तर दोन बेडुकांची लव्ह स्टोरी आहे. हो, अगदी बरोबर. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पावसामुळे पाणी साचलं आहे. या साचलेल्या पाण्यात प्लास्टिकच्या एका झाकणावर एक बेडूक मोठ्या ऐटीत बसला आहे. तर दुसरा बेडूक या झाकणावर चढण्याचा प्रयत्न करत आहे. चित्रपटामध्ये अभिनेत्रीला वाचविण्यासाठी अभिनेता आपल्या जीव गमावतो. मात्र या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. हा झाकण्यावर बसलेला बेडूक त्या दुसऱ्या बेडूकला पुन्हा पुन्हा पाण्यात ढकलतो. 

या व्हिडीओची अजून एक गंमत म्हणजे या व्हिडीओलामागे 'टायटॅनिक' चित्रपटाचे संगीत लावण्यात आले आहे. ज्यामुळे आपल्याला नक्कीच चित्रपटातील शेवटच्या सीनची आठवण होते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा 11 सेकंदचा व्हिडीओ ट्विटवर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत त्याला 14 हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत.