प्लेनमध्ये इंटेलिजेंस कंपार्टमेंट आणि लाइट डिम करण्यामागचं कारण माहिती आहे का? पायलटने सांगितलं सिक्रेट

विमानात इंटेलिजन्स कंपार्टमेंट असो की दिवे डिम करण्याची संकल्पना, या दोन्ही गोष्टींमागे खूप मोठा तर्क आहे.

Updated: Aug 16, 2022, 07:08 PM IST
प्लेनमध्ये इंटेलिजेंस कंपार्टमेंट आणि लाइट डिम करण्यामागचं कारण माहिती आहे का? पायलटने सांगितलं सिक्रेट title=

Interesting News: एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य विमान प्रवासाला दिलं जातं. विमानाने एका देशातून दुसऱ्या देशात वेगाने जाता येतं. पूर्वी विमानाने प्रवास करण खूप मोठी गोष्ट होती. पण आता अनेकांना विमान प्रवास करणं सामान्य झालं आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचतो, पण उंचीवरून प्रवास केल्याने डोकं जड होतं. यामुळे जास्त धावपळ नसली तर थकवा जाणवतो. विचार करा, विमान चालवणाऱ्या पायलट्सची स्थिती काय होत असेल. विमानातील पायलट आणि क्रू मेंबर्ससाठी एक इंटेलिजेंस कंपार्टमेंट असतो. 'द सन' मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या इंटेलिजन्स कंपार्टमेंटमध्ये गुदमरल्यासारखे वाटू शकते. पण पायलटच्या थकव्याची पातळी इतकी असते की त्यांना ते जाणवत नाही. कारण कंपार्टमेंटमध्ये फक्त झोपायचे असल्याने एका बेडची आवश्यकता असते. पायलट किंवा क्रू मेंबरही या कंपार्टमेंटमध्ये विश्रांती घेऊ शकतात. 

दुसरीकडे, लँडिंग करताना विमानाचे दिवे डिम केले जातात. विशेषत: विमान संध्याकाळी किंवा रात्री लँडिंग करताना असं केलं जातं. यामागचं कारण तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या. जेव्हा तुम्ही उजेड असलेल्या ठिकाणाहून अंधाऱ्या खोलीत जाता, तेव्हा काही काळ तुम्हाला काहीही दिसत नाही. पण काही मिनिटांतच तुम्हाला तिथे दिसू लागते. हे आपल्या डोळ्यांच्या बाहुल्यांच्या आकुंचन आणि विस्तारामुळे होते. जेव्हा अंधार असतो, तेव्हा बाहुली पसरतात आणि अधिक प्रकाश डोळ्यांमध्ये प्रवेश करतो, ज्यामुळे ते अंधारातही दिसू लागते. 

विमानाच्या लँडिंग दरम्यान दिवे पूर्णपणे बंद केले आणि अपघात झाला, तर प्रवाशांना काहीच दिसणार नाही. यामुळे त्यांना आपत्कालीन दरवाजे शोधण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे फ्लाइटमध्ये अंधार पडू नये यासाठी दिवे पूर्ण बंद करण्याऐवजी डिम केले जातात. विमानात इंटेलिजन्स कंपार्टमेंट असो की दिवे डिम करण्याची संकल्पना, या दोन्ही गोष्टींमागे खूप मोठा तर्क आहे.