VIDEO : मुलांकडे लक्ष द्या! उंच इमारतीच्या धोकादायक काठावर चिमुकला धावत होता अन् मग...

Viral Video : पालकांनो मुलांकडे लक्ष द्या. तो चिमुकला उंच अशा इमारतीच्या धोकादायक काठावरुन धावताना दिसतानाचा एक धक्कादायक व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवतोय. 

नेहा चौधरी | Updated: Sep 5, 2023, 01:27 PM IST
VIDEO : मुलांकडे लक्ष द्या! उंच इमारतीच्या धोकादायक काठावर चिमुकला धावत होता अन् मग...  title=
Today Trending Video child walk on narrow ledge of building viral video on Social Media

Trending Video : लहान मुलं खूप निरागस आणि धाडसी असतात. त्यांना लहानपणी कसलीही भीती वाटत नसते. खरं तर आजकालची पोरं खूप जास्त खोडकर आणि बदमाश असतात असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. लहान मुलांकडे डोळ्यात अंजन घालून लक्ष द्यावं लागतं, अन्यथा नजर हटी आणि दुर्घटना घटी अशी गत होते. मुलांच्या प्रत्येक कृत्याकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. लहान मुलांना बरोबर काय चुकू काय हे देखील कळतं नसतं. त्याशिवाय जीवाला धोका म्हणजे काय असतो याची त्यांना कल्पना नसते. (Today Trending Video child walk on narrow ledge of building viral video on Social Media )

त्यामुळे अनेक वेळा त्यांच्या कृत्यामुळे ते जीव धोक्यात घालतात. आपण अनेक वेळा अशा घटना ऐकल्या किंवा आजूबाजूला ऐकलं आहे की,  कधी लहान मुलांने तोंडात काही तरी घातलं आणि नंतर त्यासाठी त्याच्या जीव वाचविण्यासाठी ऑपरेशन करायची वेळ येते. पालकांना या आजकालच्या मुलांकडे लक्ष देताना हातातील सर्व काम बाजूला ठेवावी लागतात. पण काही कामं ही करावीच लागतात आणि तोच क्षण हेरून लहान मुलं काहीतरी कारनामा करतो. 

सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा धोकादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये बहुमजली अशी उंच इमारत दिसत आहे. तुम्ही नीट पाहिलं तर एक चिमुकला साधारण 3 वर्षांचा तो असेल. इमारतीच्या खिडकी बाहेरील छोट्याशा काठावर तो उतरतो. एवढंच नाही तर तो एका बाजूने दुसऱ्या बाजूला चालण्यास सुरु करतो. एका वेळाला तो त्या काठावरुन धावताना दिसतो. तो धावत खोलीच्या बाल्कनीकडे जातो. तिथे तो बाल्कनीत उतरण्याचा प्रयत्न करतो पण त्याला जमत नाही. 

तो पुन्हा मागे वळतो आणि दुसऱ्या बाजूच्या खिडकीकडे धावत जातो. या काठावरुन जर त्याचा पाय घसरला तो डगमगला क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं. सुदैवाने मुलाचं नियंत्रण जबरदस्त असल्याने तो सुखरुप खिडकीपर्यंत पोहोचतो. हा हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

कुठला आहे हा व्हिडीओ?

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ स्पेनमधील आहे. त्याचे आई वडील आंघोळीला गेले असताना हा चिमुकल्या त्यांच्या नकळत खिडकीतून खाली इमारतीच्या काठावर उतरला. या मुलाला पाहता क्षणी समोरील इमारतीमधील एका हे धोकादायक दृष्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. वडील मुलाला पाहण्यासाठी आले असताना चिमुकल्याला पाहता क्षणी त्यांचा श्वास अडकला आमि ते सुरक्षारक्षकाकडे धाव गेले.

पालकांविरोधात रोष !

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या ट्वीटरवरील Fights HQ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.  हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहे. त्यांनी पालकांनाला खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान हा व्हिडीओ मन विचलित करणारा आहे.