नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक हरगोविंद खुराना यांच्याबद्दल काही खास गोष्टी...

चिकित्सा विज्ञान क्षेत्रातील भारतीय वंशाच्या अमेरिकन वैज्ञानिक हरगोविंद खुराना यांची आज ९६ वी जयंती आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 9, 2018, 06:25 PM IST
नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक हरगोविंद खुराना यांच्याबद्दल काही खास गोष्टी... title=

नवी दिल्ली : चिकित्सा विज्ञान क्षेत्रातील भारतीय वंशाच्या अमेरिकन वैज्ञानिक हरगोविंद खुराना यांची आज ९६ वी जयंती आहे. त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या जयंतीनिमित्त गूगलने डूडल बनवून एक रंगीत आणि ब्लॅक अॅंड व्हाईट चित्र बनवून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. या चित्रात खुराना वैज्ञानिक प्रयोग करताना दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांचा एक मोठा फोटो देखील बनवण्यात आला आहे.

त्यांच्या विषयीच्या काही खास गोष्टी...

  • हरगोविंद खुराना यांचा जन्म ९ जानेवारी १९२२ मध्ये रायपूर येथील एका गरिब कुटुंबात झाला. त्यांना मोठी पाच भावंडे होती. हे सर्वात लहान. भारत सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त करून ते संशोधनासाठी इंग्लंडला गेले.
  • त्यांनी १९५२ ते १९६० या काळात यूनिवर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया येथे प्राध्यापक म्हणून काम केले. त्याच काळात त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना अमेरिकी वैज्ञानिकांचा मार्शल डब्ल्यू. नीरेनबर्ग आणि डॉ. रॉबर्ट डब्‍लू. रॅले यांच्या संयुक्त विद्यमानाने नोबेल पुरस्कार देण्यात आला.
  • या संशोधनातून असे सिद्ध झाले की, पेशींचे आनुवंशिक कूट पुढे घेऊन जाणाऱ्या न्यूक्लिक अॅसिड न्यूक्लिओटाइड्स सारख्या पेशींचे प्रोटीन सिंथेसिस नियंत्रित होते.
  • उच्च शिक्षण घेतल्यानंतर खूराना पुन्हा भारतात परतले. मात्र येथे काम करण्यासाठी योग्य संधी न मिळाल्याने ते पुन्हा इंग्लंडला परतले. १९६६ मध्ये त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले. त्याचबरोबर त्यांना नॅशनल मेडिकल ऑफ सायन्स हा पुरस्कार देण्यात आला.