फूड ऑर्डरची डिलिव्हरी घेऊन गेली तरुणी; कस्टमरने नग्न होवून घराचा दरवाजा उघडला आणि...

घरोघरी पार्सल  डिलिव्हरी करणाऱ्या महिलेला अत्यंत धक्कादायक अनुभव आला आहे. कुणी कल्पनाही करणार नाही असे कृत्य कस्टमरने तिच्यासह केले आहे.  

Updated: Jul 9, 2023, 05:36 PM IST
फूड ऑर्डरची डिलिव्हरी घेऊन गेली तरुणी; कस्टमरने नग्न होवून घराचा दरवाजा उघडला आणि...  title=

Shocking News : महिला कुठल्याच क्षेत्रात कमी नाहीत. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मिळेल ते काम करण्याची महिलांची तयारी असते. यामुळेच अगदी घरोघरी जावून फूड ऑर्डरची डिलीव्हरी करण्याचे काम देखील महिला करत आहे. मात्र, होम  डिलिव्हरीचे काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना लंडनमध्ये घडली आहे. एक तरुणी फूड ऑर्डरची  डिलिव्हरी घेऊन गेली होती. या तरुणीने दरावाडा ठोठावला असता ऑर्डर करणाऱ्या कस्टमरने नग्न होवून घराचा दरवाजा उघडला.  हा प्रकारामुळे तरुणीला मोठा धक्का बसला. महिलेने याबाबत कंपनीनेकडे तक्रार केली आहे. 

नेमकं काय घडलय?

पीडित महिला ही लंडनमधील डिलिव्हरू, जस्ट ईट आणि उबेरईट्ससाठी फूड पार्सलची डिलीव्हरी करण्याचे काम करते. ती एका पार्सलची डिलीव्हरी करण्याठी गेली होती. मात्र, तिला अत्यंत धक्कादायक अनुभव आला आहे. एका कस्टमरने आपल्या कृतीतून तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला.

दरवाजा उघडल्यावर महिलेला धक्का बसला

फूड ऑर्डरची  डिलिव्हरी घेऊन गेलेल्या महिलेने कस्टमरच्या घराची बेल वाजवली. मात्र, दरवाजा उघडल्यावर समोर जे चित्र दिसले ते पाहून महिलेला मोठा धक्का बसला. कारण, कस्टमर नग्न अवस्थेत पार्सलची डिलीव्हरी घेण्यासाठी आला होता. महिलेने जेवणाचे पार्सल कस्टमरच्या दारात ठेवून पळ काढला. हा प्रकार पाहून मला खूपच धक्का बसला. काय बोलावे? काय करावे मला काहीच समजत नव्हते. यामुळ मी तेथून तडकाफडकी निघून गेले. 
कस्टमरना आधीच समजते महिला पार्सल घेवून येणार आहे

ऑनलाईन फूड ऑर्डर केल्यावर App द्वारे कस्टमर्सना आधीच समजते की महिला ऑर्डरची डिलिव्हरी घेवून येणार आहे. यामुळे कस्टमर महिला कर्मचाऱ्यांची छेड काढतात. अनेकजण जेवण सर्व्ह करायला सांगतात. तर, यापूर्वीही एका कस्टरमने माझ्यासोबत ड्रींक असे मला सांगितले होते असे देखील पीडित महिलेने सांगितले आहे. 

'द इंडिपेंडेट'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. लंडनमध्ये पार्सल डिलिव्हरीचे काम करणाऱ्या  अनेक महिलांना ग्राहकांकडून असा प्रकारटे चित्र विचित्र अनुभव आले आहेत. अनेक महिला कर्मचाऱ्यांनी याबाबत 'द इंडिपेंडेट'ने तक्रार केली आहे. अशा प्रकारच्या तक्रारी केल्यास नोकरीच्या ठिकाणी अडचण येवू शकते या भितीने  अनेक महिला याबाबत तक्रार करुन प्रकरण वाढवत नाहीत.