Open The Door Man Shout In Flight: विमानाने उड्डाण घेतल्यानंतर वाद, हाणामारी आणि बाचाबाची होण्याचे प्रकार अनेकदा बातम्यांमधून वाचायला आणि ऐकायला मिळतं. पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार क्रोशियाहून लंडनला जाणाऱ्या विमानात घडला. येथील कदर शहरातून उड्डाण घेतलेल्या रायन एअरच्या विमानामध्ये हा संपूर्ण विचित्र प्रकार घडला.
रायन एअरचं हे विमान उड्डाण घेण्यासाठी रन-वेववर धावू लागलं तेव्हा अचानक एक प्रवासी आपल्या जागेवर उभा राहिला. त्याने आपल्या शेजारच्या प्रवाशाला वैतागून आरडाओरड सुरु केली. ही व्यक्ती आपल्या जागेवरुन उठली आणि विमानाच्या दरवाजाकडे चालू लागली. ही व्यक्ती जोरजोरात, 'ओपन द डोअर (दरवाजा उघडा) मला खाली उतरायचं आहे,' असं ओरडत होती. ही व्यक्ती इतकी संतापली होती की तिला थांबवणं एका व्यक्तीला शक्य नव्हतं. ही व्यक्ती विमानाच्या दरवाजाकडे जात असल्याचं पाहून 2 ते 3 लोकांनी तिला पकडून थांबवण्याचा प्रयत्न केला.
या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ विमानात बसलेल्या अन्य एका व्यक्तीने शूट केला आणि त्यानंतर तो व्हायरल केला. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये विमानामध्ये उच्छाद घालणाऱ्या व्यक्तीला विमानातून उतरवलं जात असल्याचं दिसत आहे. ही व्यक्ती स्वत:च्या अटकेला विरोध करताना दिसत आहे. या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं. 'द मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या या व्यक्तीला एका अधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी ताब्यात ठेवण्यात आलं आहे. या विमानामधील बरेचेस प्रवासी हे हिडआऊट नावाच्या म्यूझिक कॉन्सर्टमधून मायदेशी जात होते.
A British man was allegedly disturbed so badly by the passenger sitting next to him on a plane, that he tried to open the door of the plane and leave whilst it was still in the air.
First a woman in US now this. What is going on? pic.twitter.com/zAb96FySvI
— Dr. Anastasia Maria Loupis (@DrLoupis) July 6, 2023
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. सध्या लोक एवढे चिडचिड करणारे झाले आहेत की त्यांच्यावर नियंत्रण मिळवता येत नाही. लोक एवढे वैतागलेले असतात की अशा छोट्या छोट्या गोष्टींवरुन आरडाओरड करत इतरांना वेठीस धरण्यास सुरुवात करतात.
काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियामध्येही असाच प्रकार घडला होता. येथील एका व्यक्तीने हवेत असलेल्या विमानाचा दरवाजा अचानक उघडला होता. यामुळे अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र सुदैवाने यामुळे कोणताही मोठा अपघात झाला नाही. हा प्रकार एशियन एअरलाइन्सच्या ए-321 विमानात घडला. विमान लॅण्ड करण्याच्या काही काळ आधी हा प्रकार घडला.