मुंबई : चीनमधील मानवी हक्कांचे उल्लंघन कोणापासून लपलेलं नाही. याठिकाणी उइगर मुस्लीम महिलांवर सतत अत्याचार होत असतात. चीनमध्ये उइगर मुस्लीमांना कैद करण्यासाठी खोल्या आहेत. जेथे प्रत्येक दिवशी महिलांवर बलात्कार होत असतात. चिनी सैनिकांकडून महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो पण त्याठिकाणी त्यांचं ऐकणारे कोणीच नसतं. खरं सांगयचं झालं तर याठिकाणी उइगर मुस्लीमांना पुन्हा शिक्षीत करण्यासाठी म्हणजेचं 'री-एज्यूकेट' करण्यासाठी भव्य शिविर तयार करण्यात आले आहेत.
या शिविरात 10 लाखांपेक्षा जास्त महिला आणि पुरूषांना कैद करण्यात आलं आहे. या शिबिरांमध्ये उइगर महिलांवर चिनी प्रशासनाकडून पूर्ण नियोजन करून सामूहिक बलात्कार केला जात आहे. शिवाय महिलांचा सतत लैंगिक छळ होत आहे. एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 'कोरोना व्हायरसची भीती असल्यामुळे चीनी कायम मास्क घालून लावून यायचे. रात्रीच्या वेळी कोणत्याही क्षणी ते शिविरात यायचे.'
चिनी सैनिक महिलांवर पाळत ठेवून कॅमेरा नसलेल्या 'ब्लॅक रूम' मध्ये घेवून जायचे. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, री-एज्युकेशन नावाखाली चालणाऱ्या शिबिरात महिलांचे दागिने काढून त्यांना ठेवले जातात. यानंतर, त्याला एका खोलीत बंद करण्यात आले, जिथे काही महिला आधीच कैदेत होत्या.
शिनजियांग छावणीतून पळून अमेरिकेत आलेल्या एका महिलेने एक धक्कादायक खुलासा केला आहे. दररोज रात्री महिलांना उचलून घेवून जायचे. त्यानंतर मास्क घातलेला एक व्यक्ती बलात्कार करायचा. शिवाय महिलांसोबत सामूहिक बलात्काराच्या घटना देखील घडल्या आहेत. ज्या महिलेने या सर्व गोष्टींचा खुलासा केला तिला देखील या सर्व प्रसंगांचा सामना केला.