गाईच्या शेणापासून फॅशनेबल ड्रेस; अनोखा स्टार्टअप

नेदरलँडमध्ये अनोखा स्टार्टअप

Updated: Aug 4, 2018, 11:00 AM IST
गाईच्या शेणापासून फॅशनेबल ड्रेस; अनोखा स्टार्टअप title=

नवी दिल्ली: गोवंश, गोरक्षण, गोहत्या अशा विविध मुद्यांवरून भारतातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यारून भारतातील स्टार्टअपवरचे लक्ष काहीसे भलतीकडे वळले आहे. पण, तिकडे नेदरलँडमध्ये मात्र गाईबद्धल एक महत्त्वपूर्ण स्टार्टअप सुरू झाल्याची बातमी आहे. इथे चक्क गाईच्या शेणापासून फॅशनेबल ड्रेस बनविण्याचे तंत्र विकसित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. हा स्टार्टअफ बायोआर्ड लॅब जलिला एसाईदी चालवतात. गाईच्या सेल्युलोज ज्याचे फॅब्रिक बनवले जाते, त्याला 'मेस्टिक' असे नाव देण्यात आले आहे. त्यापासून शर्ट आणि टॉप बनविण्यात येत आहेत. स्टार्टअपने शेणाच्या सेल्युलोजपासून बनवलेल्या बायो-डिग्रेडेबल प्लास्टिक आणि पेपर बनविण्यातही यश मिळवले आहे.

या उपक्रमाला सुमारे दोन लाख डॉलर १.४० कोटी) चा चिवाज व्हेंचर एच अॅण्ड एम फाऊंडेशनकड़ून ग्लोबल अवॉर्डही देऊनही गौरविण्यात आले आहे. एसाईदी यांनी म्हटले आहे की, हे अक भविष्यातील फ्रॅब्रिक आहे. आम्ही शेणाला वेस्ट मटेरिअल समजतो. पण, फॅब्रिक बनवण्यासाठी सुरूवातीच्या काळात जे तेल वापरले जाते ते फारसे चांगले असत नाही. आपल्याला शेणाच्या शेल्युलोजमध्ये लपलेले सौंदर्याबद्धल सर्वांना सांगावे लागेल. इसाईदी सध्या १५ शेतकऱ्यांसोबत या उपक्रमासाठी काम करत आहेत. ते यंदा औद्योगिक पातळीवर रिफायनरी युनिट सुरू करत आहेत.

पुढे बोलताना एसाईदीने सांगितले की, ही प्रक्रिया केमिकल आणि मॅकेनिकल आहे. आम्हाला जे शेण आणि गोमूत्र मिळते, त्यात ८० टक्के पाणी असते. ओल्या आणि सुक्या गोमुत्राला वेगवेगळे खरेदी केले जाते. ओल्या भागाचे सॉल्वेंट से सेल्युलोज बनविण्यासाठी फर्मेंटेशन होते. यात अधिक हिस्सा हा गवत आणि मक्याचा असतो. जो गायचा प्रमुख आहार असतो. सर्वसाधारणपणे कपडा उद्योगापेक्षा ही प्रक्रिया अधिक चांगली आहे. कारण, गायच्या पोटातूनच हे फायबर नरम होण्यास सुरूवात होते.