काबूल : Taliban in Afghanistan : तालिबानने आता अफगाणिस्तानवर पूर्णपणे ताबा मिळवला आहे. (Situation in Afghanistan) अफगाणिस्तानमध्ये घडणाऱ्या प्रत्येक हालचालीबद्दल जगाला जाणून घ्यायचे आहे. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात असे दिसून येते की, तालिबानी महिलांना राजकारणात प्रवेश करण्याच्या आणि त्यांच्यासाठी मतदान करण्याच्या प्रश्नावर हसताना दिसत आहे. जेव्हा एका महिला रिपोर्टरने तालिबानींना कॅमेरासमोर महिलांविषयी असा प्रश्न विचारला, तेव्हा जणू ते त्यांची चेष्टा करत होते. यावेळी ते हसून खिल्ली उडवत कॅमेरा बंद करण्याचा इशारा करत होते.
दरम्यान, हा व्हिडिओ खूप जुना आहे, जेव्हा तालिबानने 1996 ते 2001 दरम्यान अफगाणिस्तानवर राज्य केले होते. पूर्वी आणि आताच्या तालिबानींमध्ये मोठा फरक आहे. जुन्या व्हिडिओबद्दल बोलताना, त्यावेळी एका महिला रिपोर्टरने तालिबान्यांना विचारले की, महिला नेत्यांना अफगाणी मतदान करू शकतील का? त्यांनाही निवडणूक लढण्याचे स्वातंत्र्य मिळेल का? यावर तो हसला आणि म्हणाला समोरून कॅमेरा काढून टाका. इतक्या वर्षांनी हा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे.
Taliban collapses with laughter as journalist asks if they would be willing to accept democratic governance that voted in female politicians - and then tells camera to stop filming. “It made me laugh” he says.pic.twitter.com/km0s1Lkzx5
— David Patrikarakos (@dpatrikarakos) August 17, 2021
माहितीपटाच्या एका भागाची एक छोटी क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कारण तालिबानने काबुलमध्ये प्रवेश केला त्या दिवशी 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा पूर्ण झाला होता. तालिबानच्या नेत्यांनी मंगळवारी पत्रकारांना दिलेल्या पहिल्या भाषणात स्पष्ट केले की तालिबान गेल्या 20 वर्षांमध्ये बदलले आहे.
तालिबान नेतृत्वाने मंगळवारी सांगितले की महिलांना इस्लामिक कायद्यानुसार स्वातंत्र्य असेल, हे सूचित करते की हा गट देशात बुरखा अनिवार्य करणार नाही, परंतु हिजाब करेल.