नवी दिल्ली : आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्यातील युद्ध थांबलं असलं तरी दोन्ही देशांतील संघर्ष अजूनही सुरुच आहे. वादात असलेली नागोर्नो-करबख क्षेत्रात 27 सप्टेंबरला सुरु झालेल्या युद्धात 73 नागरिकांसह कमीत कमी 600 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेने दोन्ही देशांना युद्धाविरामचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
अजरबैजान आणि आर्मेनिया यांनी एकमेकांवर युद्धविराम तोडण्याचा आरोप केला होता. युद्धविराममध्ये देखील काही भागात गोळीबार केल्याचा आरोप केला गेला.
अमेरिकेचं आवाहन
अमेरिकेने अजरबैजान आणि आर्मेनिया यांना आवाहन केलं आहे की, त्याने संघर्षविराम लागू करावं. नागरिकांना लक्ष्य केलं जावू नये. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी म्हटलं की, 'दोन्ही देशांना मिन्स्क समूह आग्रह करतो की, त्याने युद्धविराम लागू करण्यासाठी त्वरीत पावलं उचलावी.'
रशिया, फ्रान्स आणि अमेरिकेसह मिन्स्क समूह देशाने या संघर्षामुळे भयानक परिस्थितीचा इशारा दिला आहे. जर हे युद्ध सुरु राहिलं तर अजरबैजानचा समर्थक तुर्कीने म्हटलं की, रशिया, अजरबैजान, आर्मेनिया आणि तुर्की यांच्यात चर्चा व्हावी. तुर्कीने म्हटलं की, रशिया आर्मेनियाच्या बाजुने आहे आणि आम्ही अजरबैजानचे समर्थन करतो. त्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी 4 देशांमध्ये चर्चा व्हावी. 30 वर्षानंतर आता एक नवीन तंत्र शोधण्याची गरज आहे.’
अजरबैजानच्या या भागात आर्मेनियाचं बहुमत आहे. 1991 मध्ये सोवियत संघ तुटल्यानंतर दोन्ही देशांमध्ये एक फ्लॅशपॉइंट बनला होता. 90 च्या दशकात झालेल्या या दोन्ही देशांमधील युद्धात कमीत कमीत 30 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. 1994 मध्ये युद्धविराम करार झाला होता. पण आज पुन्हा एकदा तीच परिस्थिती तयार झाली आहे.