नॉर्वे : हे संपूर्ण जग गोल आहे असं आपण अनेकदा म्हणतो. पण तरीही कधीतरी हा प्रश्न मनात नक्कीच आला असेल की , जगाचा अंत कुठे होणार? हा प्रश्न तुम्ही एखाद्याला विचारलात तर शक्यतो कोणीही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही. पण हा रस्ता जग कुठे संपतं हे आम्ही सांगू शकतो.
युरोपियन देश नॉर्वेमध्ये असा एक रस्ता आहे, ज्या रस्त्याचा शेवट जगाचा अंत मानला जातो. असं म्हणतात की, हा जगातील शेवटचा रस्ता आहे, ज्याच्या शेवटी तुम्हाला समुद्र आणि हिमनदीशिवाय काहीही दिसत नाही. हा रस्ता E-69 महामार्ग म्हणून ओळखला जातो. आज आम्ही तुम्हाला या रस्त्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.
उत्तर ध्रुव हा पृथ्वीवरील सर्वात दूरचा बिंदू आहे, जिथून पृथ्वीचा अक्ष फिरतो. E-69 महामार्ग पृथ्वीच्या टोकाला नॉर्वेशी जोडतो. हा रस्ता अशा ठिकाणी संपतो जिथून तुम्हाला रस्ता दिसत नाही. सर्वत्र फक्त बर्फ, बर्फ आणि समुद्र दिसतील. या रस्त्याची लांबी सुमारे 14 किलोमीटर असल्याचं सांगण्यात येतं.
जर तुम्हाला E-69 हायवेवर जायचं असेल आणि जगाचा शेवट जवळून पाहायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला अनेक लोकांचा ग्रुप तयार करावा लागेल आणि इथे जाण्याची परवानगी घ्यावी लागेल. या रस्त्यावरून कोणत्याही व्यक्तीला एकट्याने जाण्यास किंवा वाहन चालवण्यास परवानगी नाही. याचं कारण म्हणजे अनेक किलोमीटरपर्यंत सगळीकडे बर्फाची दाट चादर आहे, त्यामुळे याठिकाणी हरवण्याचा धोका आहे.
याठिकाणी दिवस आणि रात्रीची परिस्थितीतीही खूप वेगळा असते. उत्तर ध्रुवाजवळ असल्यामुळे हिवाळ्यात सहा महिने अंधार असतो आणि उन्हाळ्यात सतत उजेड असतो. म्हणजेच हिवाळ्यात दिवस नसतो आणि उन्हाळ्यात रात्र नसते. मात्र अशा अडचणीच्या काळातही अनेक लोक याठिकाणी राहतात.