नवी दिल्ली : सीमेवर पाकिस्तानच्या (Pakistani terrorist) कुरापती सुरूच असताना आता एका मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. सीमेपलिकडे थोडेथोडके नव्हे, तर तब्बल 400 अतिरेकी पाकिस्तानी (Pakistani) लष्कराच्या मदतीने घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. (400 terrorists in Pakistan ready to infiltrate into India, tells Pakistani terrorist) भारतात आणि विशेषतः काश्मीरमध्ये मोठ्या घातपाती कारवाया करण्याचे कारस्थान आखले गेले आहे.
सध्या काश्मीरमध्ये तुफानी बर्फवृष्टी होत आहे. त्याचवेळी बर्फाच्या चादरीवर हातपाय पसरण्याची तयारी पाकिस्तानात सुरू आहे. तब्बल 400 अतिरेकी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतात घुसण्याची तयारी करतायत. इथं मोठ्या प्रमाणात घातपाती कारवाया करण्याचा कट पाकिस्तानात शिजला आहे.
पाकिस्तानचे भारताविरोधात मोठे कारस्थान, 400 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत#India #Pakistan #Terrorist pic.twitter.com/VzizdZ14O9
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 9, 2021
जम्मू-काश्मीर पोलिसांमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पीर पंजालच्या उत्तरेकडे, म्हणजे काश्मीर खोऱ्याजवळ असलेल्या लाँच पॅडवर 175 चे 210 अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत आहेत. तर पीर पंजालच्या दक्षिणेकडे, जम्मू क्षेत्राजवळ 119 ते 216 अतिरेकी तयार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या घुसरखोरीपेक्षा हा आकडा कितीतरी अधिक आहे.
- 2018मध्ये 143 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती.
- 2019मध्ये हा आकडा 141वर आला.
- तर गेल्यावर्षी अवघे 44 अतिरेकीच भारतीय हद्दीत येऊ शकले
यंदा मात्र 400च्या आसपास अतिरेकी (Pakistani terrorist) भारतात घुसण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात तब्बल 5 हजार 100 वेळा सीमेपलिकडून गोळीबार झालाय. या कव्हरिंग फायरच्या आडून घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात येते.
भारतामध्ये अतिरेकी कारवाया करण्याचा कट पाकिस्तान वारंवार आखत असतोच. मात्र यावेळी गुप्तचरांच्या माहितीत समोर आलेला संभाव्य घुसखोरांचा आकडा खूपच मोठा आहे. अर्थात, आपले जवान डोळ्यात तेल घालून सीमांचं रक्षण करत आहेत. आपल्या सैन्याचा 'जोशही हाय' आहे. त्यामुळे पाकिस्तानची ही कारस्थानं कधीच यशस्वी होणार नाहीत.