काबुलमध्ये २६/11 सारखा दहशतवादी हल्ला, हॉटेलमध्ये घुसले दहशतवादी

अफगानिस्तानची राजधानी काबुलमध्ये काबुल्स इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 21, 2018, 12:42 PM IST
काबुलमध्ये २६/11 सारखा दहशतवादी हल्ला, हॉटेलमध्ये घुसले दहशतवादी title=

काबूल : अफगानिस्तानची राजधानी काबुलमध्ये काबुल्स इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे.

मुंबईतील २६/११ हल्ल्याप्रमाणे दहशतवादी एका हॉटेलमध्ये घुसले आहेत. आतापर्यंत या हल्लात ५ लोकांचा मृत्यू झाला आहे. ८ लोकं आतापर्यंत जखमी झाल्याची माहिती आहे. जवानांनी ३ दहशतवाद्यांना ठार केलं आहे. तर ४१ परदेशी नागरिकांसह १२६ जणांना वाचवण्यात आलं आहे.

अग्निशमन दलाचे कर्मचारी हॉटेलच्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. शनिवार रात्री ९ वाजता हा हल्ला झाला. जेव्हा दहशतवादी इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये किचनमध्ये जबरदस्ती घुसले तेव्हा त्यांनी तेथे उपस्थित स्टाफ आणि लोकांवर फायरिंग सुरु केली. त्यानंतर स्पेशल फोर्स आणि सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण हॉटेलला आपल्या ताब्यात घेतलं आहे.