Viral Video: माणसाचे डोळे फोडणारा कोणता हा पक्षी? पाहून उडेल थरकाप

Woman Attacked By Magpie: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात पक्षी महिलेवर हल्ला करत असल्याचे दिसत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 2, 2024, 06:59 PM IST
Viral Video: माणसाचे डोळे फोडणारा कोणता हा पक्षी? पाहून उडेल थरकाप title=
Terrifying Magpie Bird Attack On Woman Eye Video Viral

Magpie Swooping Season In Australia: जगभरात असे अनेक पक्षी व प्राणी आहेत ते त्यांच्या सुंदरतेसाठी ओळखले जातात. तसंच, काही पक्षी हे त्यांच्या आक्रमकतेसाठीही प्रसिद्ध आहेत. अनेका पक्षाने माणसांवर हल्ला केल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतीलच. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत एका पक्षीने महिलेवर हल्ला केल्याचे दिसत आहे. अगदी काही सेकंदाचा हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो. (Viral Video)

इंटरनेटवर गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या पक्षाने महिलेवर हल्ला केला आहे. इतकंच नव्हे तर या महिलेचा डोळा फओडण्याचा प्रयत्न केला. या पक्षाला ऑस्ट्रेलियामध्ये मॅगपाय या नावाने ओळखले जाते तर भारतात नीळकंठ नावाने लोकप्रिय आहे. या पक्षी त्याच्या सुंदरतेसाठी लोकांना आकर्षिक करतो. तर, लोकांवर हल्ला करुन त्यांना भयभीत करुनही सोडतो. 

मॅगपाय पक्षी म्हणजेच नीळकंठ पक्षी थेट लोकांच्या डोळ्यांवरच हल्ला करतो. त्यामुळं व्यक्ती कायमचा अंध होऊ शकतो. ब्रिटनमध्ये अनेकदा अशी बातम्या येत असतात. असं म्हणतात की हे पक्षी नेहमी समूह करुन राहतात आणि त्यांच्या मुलांच्या संरक्षणासाठीच हल्ला करतात. मात्र आता मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्याने जंगलं संपत आली आहेत. त्यामुळं इमारतींवरच पक्षी घरटं बनवताना दिसत आहेत. अलीकडेच मॅगपाय पक्षाचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात तो मुलीवर हल्ला करताना दिसत आहे. 

हा पक्षी नेहमी चकाकणाऱ्या वस्तूंवर हल्ला करतो. मॅगपाय पक्षीने हल्ला केल्याचे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर kbkonline नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यात हा पक्षी थेट महिलेच्या डोळ्यावर हल्ला करतो. पण हा व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांना एक प्रश्न पडला आहे तो म्हणजे ही महिला ठिक आहे का? तिला दुखापत तर झाली नाहीये ना. तर, एकाने प्रश्न केला आहे की महिला खरं तर स्वतःला वाचवू शकली असती. मात्र, स्वतःला वाचवण्याऐवजी तीला व्हिडिओ बनवणे जास्त गरजेचे वाटले. सोशल मीडियावर आलेल्या कमेंटनुसार, ही महिला सुखरुप असल्याचे समजतंय.