कैरोतल्या चर्चेमध्ये बेछूट गोळीबार, १० ठार

इजिप्तमध्ये पुन्हा एकदा चर्चला अतिरेक्यांनी लक्ष केलंय. 

Updated: Dec 29, 2017, 11:52 PM IST
कैरोतल्या चर्चेमध्ये बेछूट गोळीबार, १० ठार  title=

कैरो : इजिप्तमध्ये पुन्हा एकदा चर्चला अतिरेक्यांनी लक्ष केलंय. 

राजधानी कैरोजवळ असलेल्या मार मीना चर्चवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जण ठार तर, आठ जण जखमी झालेत. मोटर सायकलवरून आलेल्या दोन बंदुकधाऱ्यांनी चर्चमध्ये आलेल्या भाविकांवर बेछूट गोळीबार केला. 

सुरक्षा रक्षकांनी एका हल्लेखोराला गोळ्या घातल्या मात्र दुसरा हल्लेखोर तिथून पसार झालाय. कॉप्टिक ख्रिश्चन धर्मियांमध्ये 7 जानेवारीला नववर्षाचा उत्सव साजरा केला जातो. या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना झालेल्या या हल्ल्यामुळे इजिप्तमधल्या ख्रिश्चन नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. 

गेल्या वर्षभरात देशात अतिरेकी हल्ल्यांमध्ये 100 पेक्षा जास्त ख्रिश्चनांचा बळी गेलाय.