अमेरिकेच्या राजधानीतही अग्नितांडव, १२ जण होरपळले

भारताच्या आर्थिक राजधानीत अग्निकांड घडलं असतानाच अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कमध्येही आगीनं थैमान घातलं.

Updated: Dec 29, 2017, 11:49 PM IST
अमेरिकेच्या राजधानीतही अग्नितांडव, १२ जण होरपळले title=

न्यूयॉर्क : भारताच्या आर्थिक राजधानीत अग्निकांड घडलं असतानाच अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कमध्येही आगीनं थैमान घातलं.

गुरुवारी संध्याकाळी शहरातल्या प्रॉस्पेक्ट अव्हेन्यू या पाच मजली इमारतीला भीषण आग लागली. यात एका 1 वर्षाच्या बाळासह 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 4 जण जखमी झालेत.

अनेक तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या 160 जवानांनी ही आग अटोक्यात आणली. आग नियंत्रणात आली असली तरी इमारतीमध्ये आणखी काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतेय. 

गेल्या अनेक दशकांमध्ये न्यूयॉर्कमध्ये अशा पद्धतीनं इमारतीला आग लागण्याची घटना घडली नव्हती, हे विशेष