बीजींग : तरूणाईमध्ये आयफोनची क्रेझ भलतीच वाढत आहे. ही क्रेझ पूर्ण करण्यासाठी तरूणाई वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारीही ठेवताना दिसत आहे. नुकताच असा एक धक्कादायक प्रकार चीनमध्ये उघडकीस आला. येथील एका मुलीने आयफोन-८ची खरेदी करण्यासाठी चक्क आपले कौमार्य (व्हर्जिनीटी) विकायला काढले.
आयफोन-८ची क्रेझ पूर्ण करण्यासाठी या मुलीने आपले कौमार्य विकायला काढले खरे. पण, हा प्रकार तिच्या चांगलाच अंगाशी आला. तीला जन्मभराचा धडा मिळाला. जियो चेन असे या मुलीचे नाव असून, ती केवळ १७ वर्षांची आहे. आपल्या मैत्रिणींच्या हातात असलेला आयफोन-८ पाहून ती बेचैन व्हायची. आपल्याकडेही असा आयफोन हवा असे तिला सतत वाटायचे. पण, हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी पैसा आड यायचा. मग, पैसा कमविण्यासाठी तिने एक विचित्र कल्पना आखली. तिने आपल्या कौमार्याचा लिलाव करण्याचे ठरवले. त्यासाठी तीने जाहीरातही दिली. एका ऑनलाईन फोरमच्या माध्यमातून दिलेल्या या जाहिरातीत तीने सर्व पैसे रोख स्वरूपात मिळावे अशी अटही टाकली. कौमार्य विकण्यासाठी तिने चक्क २२८४ पौंड इतकी किंमतही जाहीर केली.
दरम्यान, तिने दिलेल्या ऑनलाईन जाहीरातीवर राजधानी बीजींगमध्ये राहणाऱ्या एका नाना नावाच्या ब्लॉगरचे लक्ष गेले. ही जाहीरात पाहून त्याने या मुलीला धडा शिकवायचे ठरवले. त्याने ग्राहक बनून जियो चेनशी संपर्क साधला. कौमार्य खरेदी करण्यासाठी दोघांमध्ये सौदा ठरला. तसेच, कोठे भेटायचे हेही ठरले. त्यानुसार दोघांनी एका हॉटेलमध्ये भेटायचे ठरवले.
जियो चेन ठरल्या वेळेप्रमाणे हॉटेलमध्ये पोहोचली सुद्धा. पण, ब्लॉगर नानाने या मुलीचे प्रॅंक करण्याच प्लॅन आगोदरच रचून ठेवला होता. जो या मुलीला चांगलाच महागात पडला. तिच्यासोबत नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पाहा.