डोकलाम : सिक्कीमधल्या डोकलाम भूभाग प्रकरणी चीन आपली हेकेखोर भूमिका सोडायला तयार नाही. डोकलाममधून आपलं लष्कर तत्काळ हटवावेत अशी उलट कांगाव्याची मागणीच चीननं केली आहे.
चीननं डोकलाममध्ये रस्ता तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे. त्यानंतरच या मु्द्द्यावर दोन्ही देशांत वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी बीजिंगमध्ये हा मुद्दा उचलला होता. सोबतच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही याआधी याच मुद्द्यावर चीनला कडक शब्दांत सुनावलं होतं.