वीज गेल्याने 'या' मंत्र्याने दिला राजीनामा

आपल्या येथे घरातील वीज जाणं म्हणजेच बत्ती गुल होण्यासारखे प्रकार नेहमीच घडत असतात. पण, एका ठिकाणी घरातील लाईट गेल्यामुळे थेट मंत्र्याने राजीनामा दिला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 16, 2017, 08:45 PM IST
वीज गेल्याने 'या' मंत्र्याने दिला राजीनामा title=

तैवान : आपल्या येथे घरातील वीज जाणं म्हणजेच बत्ती गुल होण्यासारखे प्रकार नेहमीच घडत असतात. पण, एका ठिकाणी घरातील लाईट गेल्यामुळे थेट मंत्र्याने राजीनामा दिला आहे.

तैवानमधील एका बेटावरील काही घरांची लाईट अचानक गेल्याने तैवानच्या अर्थमंत्र्यांनी आपला राजीनामा दिला आहे. 

तैवानमध्ये वीज संयंत्रातील जनरेटर खराब झाल्याने लाखो घरांमधील वीज अचानक गेली. तैवानमध्ये सध्या उकाड्याला सुरुवात होत आहे. उकाड्याच्या दिवसांत वीज गेल्याने नागरिकांना खुपच मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. 

अचानक गेलेल्या लाईटमुळे शॉपिंग मॉलमध्ये गोंधळ उडाला. अनेक कार्यालयं अंधारमय झाली. तैवानमधील सेंट्रल न्यूज एजन्सीने म्हटलं की, तांत्रिक बिघाडामुळे सर्वात मोठ्या प्राकृतिक गॅस विद्युत संयंत्राने काम करणं बंद केलं होतं. तसेच यामुळे तब्बल ६६.८ लाख घरं प्रभावित झाले होते. 

या घटनेनंतर तैवानचे अर्थमंत्री ली चिह-कुंग यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि माफी मागितली. ली चिह-कुंग यांनी म्हटलं की, ज्या कुणी व्यक्तीने चूक केली आहे त्याला शिक्षा होणार.