पाण्याचा तरंगणारा थेंब... अंतराळवीर अंतराळात पाणी कसं पितात? Sunita Williams नं प्रात्यक्षिक दाखवतच दिलं उत्तर

Sunita Williams Video : अंतराळात पाणी कसं पितात हे पाहिलं, तर म्हणाल... बापरे... एका थेंबासाठी इतका आटापिटा? पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ   

सायली पाटील | Updated: Dec 9, 2024, 12:15 PM IST
पाण्याचा तरंगणारा थेंब... अंतराळवीर अंतराळात पाणी कसं पितात? Sunita Williams नं प्रात्यक्षिक दाखवतच दिलं उत्तर  title=
Sunita Williams shows How to drink water in Space video viral

Sunita Williams Video : कैक महिने, किंबहुना वर्षभराहून अधिक काळासाठीसुद्धा अवकाशात असणाऱ्या अंतराळवीरांचं आयुष्य नेमकं कसं असतं याविषयी कायमच अनेकांमध्ये कुतूहल पाहायला मिळालं आहे. अंतराळवीर अंघोळ कशी करतात, ते जेवतात काय, त्यांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असतो, ते झोपतात कसे? असे एक ना अनेक प्रश्न फक्त लहानांच्याच नव्हे, तर मोठ्यांच्याही मानात घर करताना दिसतात. असाच एक प्रश्न म्हणजे अंतराळवीर पाणी कसं पितात? 

एका शालेय विद्यार्थिनीला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर खुद्द नासाच्या अंतराळवीर, सुनीता विलियम्स यांनीच एका प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दिलं आणि या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आता तुम्ही म्हणाल पाणी पिण्याचाच तर, व्हिडीओ; मग व्हायरल का होतोय? तर.... अंतराळात पाणी पिणं म्हणजे एखाद्या कसरतीहून कमी नाही, हेच इथं पाहायला मिळत आहे. 

एलिमेंट्री स्कूलच्या विद्यार्थ्यांशी व्ह्यर्चुअली संवाद साधताना सुनीता विलियम्स यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर ही मंडळी कशी वास्तव्य करतात, त्यांच्यापुढं कोणकोणती आव्हानं असतात यासंदर्भातील माहिती दिली. गुरुत्वाकर्षण कमालीचं कमी असतानासुद्धा कशा पद्धतीनं द्रव पदार्थ अर्थात पाणी, ज्यूस वगैरे प्यायला जातो याची माहिती त्यांनी सउहादरण दिली. 

हेसुद्धा वाचा : अ‍ॅडिलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीनं उचललं अनपेक्षित पाऊल; या निर्णयानं सुनील गावस्करांचाही विश्वास बसेना 

ISS वर द्रव पदार्थ कायमच वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे गुमधर्म दाखवतात. ज्यामुळं तिथं  पृथ्वीप्रमाणं ग्लास किंवा कपातून पाणी पिणं शक्य नसतं. परिणामी अंतराळवीर तिथं पाणी पिण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबतात. पाण्यासाठी या अंतराळवीरांकडे एक लहानसा बाटलीवजा पाऊच असतो. गुरुत्वाकर्षण कमी असणाऱ्या किंवा अगदीच गुरुत्वाकर्षण नसणाऱ्या ठिकाणी द्रव पदार्थ वाहून जाऊ नये यासाठीच हे पाऊच तयार करण्यात येतात. याच पाऊचमध्ये असणारं पाणी नेमकं कसं प्यावं? हेसुद्धा विलियम्स यांनी या शालेय विद्यार्थिनीला दाखवलं. 

व्हिडीओमध्ये पाहायला मिळत असल्यानुसार ज्या क्षणी या पाऊचमधून विलियम्स पाणी बाहेर काढतात तेव्हा पाण्याचा एक मोठाला थेंब तरंगू लागतो आणि तो थेंब पिण्यासाठी सुनीता विलियम्ससुद्धा एक उसळी घेऊन बरोबर तो पिऊन दाखवतात. पाण्यासाठीचा हा आटापिटा पाहताना विद्यार्थ्यांनाही धक्काच बसला.