लॅपटॉपमुळे अमेरिकेच्या राष्ट्रपतींची नाचक्की; कॉल गर्लला पाठवले 18 लाख रुपये

राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यानंतर झाला धक्कादायक खुलासा 

Updated: Jun 24, 2021, 07:40 AM IST
लॅपटॉपमुळे अमेरिकेच्या राष्ट्रपतींची नाचक्की; कॉल गर्लला पाठवले 18 लाख रुपये  title=

मुंबई : अमेरिकेचे आताचे राष्ट्रपती जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन याच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हंटर बायडनने 2018 साली एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेसोहत हॉटेलमध्ये रात्र घालवली होती. नकळत याचे पैसै हंटरच्या वडिलांना म्हणजे अमेरिकेच्या आताच्या राष्ट्रपतींना भरावी लागली होती. (Joe Biden accidentally paid prostitute 25000 dollar for son Hunter ) याचा दावा अमेरिकेच्या न्यूयॉर्क पोस्टने केला आहे. 

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, 2018 मध्ये हॉलिवूडच्या चेटो मारमोंट हॉटेलमध्ये कॉल गर्लसोबत रात्र घालवल्यानंतर हंटरने नकळत एक गोष्ट केली. हंटरने या कॉल गर्लचं 18 लाखांचं पेमेंट जो बायडन यांच्या अकाऊंटमधून केलं आहे. 

हंटर बायडनच्या लॅपटॉपमध्ये याबाबतचे अनेक मॅसेज, फोटो आणि व्यवहाराची माहिती मिळाली आहे. रिपोर्टनुसार, हंटर बायडन या लॅपटॉपला एका डायरीप्रमाणे वापरत असे. यामध्ये हंटरचे ईमेल, अनेक चॅट्स, आर्थिक रेकॉर्ड आणि स्वतःचे अनेक सेल्फी आहेत. एका वर्षांनंतर हंटरने आपला लॅपटॉप दुरूस्थितीसाठी पाठवला होता. त्यावेळी ही माहिती मिळाली आहे. 

रिपोर्टनुसार, 2018 च्या मे महिन्या हंटरने एका प्रवासा दरम्यान कॉल गर्लसोबत वेळ घालवला होता. हंटरने स्वतःच्या आवडीनुसार साइट 'एमराल्ड फँटसी गर्ल्स' वरून 'रशिया आणि हिरव्या रंगाचे डोळे' अशी महिलेची निवड केली. याना नावाच्या महिलेसोबत रात्र घालवली. 

हंटरच्या या वागण्याचा त्रास वडिल जो बायडन यांना झाला. जो बायडन यांच्या अकाऊंटमधून 25 हजार डॉलर म्हणजे जवळपास 18 लाख रुपयांचं पेमेंट केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हंटर यावेळी महिलेला आपलं खोट नाव सांगून मॅसेज करत होता. 'रोब' या नावाने हंटरने कॉल गर्लशी संवाद साधला. 

महत्वाची बाब म्हणजे भरपूर मद्य प्राशन करून हंटरने आपल्यावरील ताबा गमावला होता. महिलेसोबत अश्लिल व्हिडिओ तयार करून फोटो काढले होते. सकाळी उठल्यावर कॉल गर्लला तिचं पेमेंट करताना पैसे जात नसल्यामुळे जो बायडन यांच्या अकाऊंटमधून करण्यात आले. यावेळी हे पैसे टप्प्या टप्प्याने देण्यात आले. एवढे पैसे अकाऊंटमध्ये बघून महिला खूष झाली होती. हे सगळे पुरावे लॅपटॉपमध्ये होते.