श्रीलंका धुमसत असताना 'ती' भारतात आली, युपीतल्या तरुणाशी लग्नगाठ बांधली

मुळच्या श्रीलंकेच्या असलेल्या एका तरूणीने भारतात येऊन युपीतल्या तरूणाशी लग्न केलेय. त्यामुळे या लग्नाची एकच चर्चा रंगलीय.  

Updated: May 16, 2022, 09:31 PM IST
श्रीलंका धुमसत असताना 'ती' भारतात आली, युपीतल्या तरुणाशी लग्नगाठ बांधली title=

मुंबई : श्रीलंकेची अर्थव्यवस्था संकटात आल्यापासून देशभरात राजकीय अस्थिरता निर्माण झालीय. आठवड्याभरापूर्वीच श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षेंचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रपती गोतबाया राजपक्षेंच्या राजीनाम्यावरून वातावरण तापलेय. या दरम्यान अनेक नेत्यांवर हल्ले होऊन मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या. या सर्वांत  मुळच्या श्रीलंकेच्या असलेल्या एका तरूणीने भारतात येऊन युपीतल्या तरूणाशी लग्न केलेय. त्यामुळे या लग्नाची एकच चर्चा रंगलीय.  

उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यातील सिरथू तहसीलमधील कडा, फरीदगंज येथील रहिवासी असलेला बलराम या तरूणाच्या वडिलांचे १० वर्षांपूर्वी निधन झाले होते. दरम्यान बलरामने संगणक प्रशिक्षण घेत, ऑपरेटरचा व्हिसा मिळवत चार वर्षांपूर्वी सौदी गाठल होतं. तेथून त्याला दक्षिण आफ्रिकेत पाठवण्यात आले. त्यामुळे त्याचा पगारही वाढला.  

दक्षिण आफ्रिकेतील नोकरी करताना त्याची ओळख श्रीलंकेच्या मधुषा जयवंशी यांच्याशी झाली. मधुषा जयवंशी या संगणकाचा अभ्यास करण्यासाठी तेथे यायच्या. दोघांमध्ये चांगली ओळख निर्माण झाली. या ओळखीचे रूपांतर नंतर मैत्रीत झाले आणि नंतर एकमेकांवर प्रेमही जडले.  

दरम्यानच्या काळात मधुशा कोर्स पूर्ण करून श्रीलंकेला परत गेली. पण बलरामला त्याची कल्पना नव्हती. कोचिंग सेंटरमधून बलरामला याची माहिती मिळताच त्याने थेट श्रीलंका गाठले. आणि तब्बल ६ महिन्यांनंतर दोघे पुन्हा भेटले. यानंतर बलराम पुन्हा दक्षिण आफ्रिकेत आला.  

अचानक  श्रीलंकेत आर्थिक संकट निर्माण झाले आणि गोंधळ उडाला. याबाबत मधुशाने दक्षिण आफ्रिकेत बसलेल्या तिच्या प्रियकर बलरामला ही माहिती दिली. बलरामने विमानाने श्रीलंका गाठले. आणि दोघांनी श्रीलंकेत दोघांनी कोर्ट मॅरेज केले. यानंतर बलराम भारतात आला आणि त्याने आपल्या कुटूंबियांना या नात्याबद्दल माहिती दिली. 

घरच्या मंडळींनी या नात्याला स्विकारल्यानंतर मधुशाला 20 दिवसांसाठी टुरिस्ट व्हिसा घेत भारतात आल्या. मधुशा ८ मे रोजी कौशांबीला आली. हिंदू रितीरिवाजांसोबत झालेल्या भव्य सोहळ्यात दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घालून, सिंदूर लावून दोघेही लग्नबंधनात अडकले. आणि अशाप्रकारे श्रीलंकेची तरूणी युपीची सून झाली. या लग्नाची आता चर्चा रंगतेय.