Sri Lanka Econimics Crisis : श्रीलंकेत परिस्थिती आणखी चिघळली, आंदोलनकर्त्यांचा पंतप्रधानांच्या घराला घेराव

Sri Lanka Economic Crisis :  श्रीलंकेची आर्थिक घडी विस्कटल्याने तिथील परिस्थिती चिघळली आहे. अजूनही हिंसक प्रदर्शन सुरु आहे. 

Updated: Jul 13, 2022, 05:10 PM IST
Sri Lanka Econimics Crisis : श्रीलंकेत परिस्थिती आणखी चिघळली, आंदोलनकर्त्यांचा पंतप्रधानांच्या घराला घेराव title=

कोलंबो : श्रीलंकेची आर्थिक घडी विस्कटल्याने तिथील परिस्थिती चिघळली आहे. अजूनही हिंसक प्रदर्शन सुरु आहे. आंदोलकांनी राष्ट्रपतींनंतर आता पंतप्रधानांच्या घरालाही घेराव घातला आहे. या सर्व घडामोडीदरम्यान राष्ट्रपती गोटाबायो राजपक्षे राजीनामा देत आहेत. त्यामुळे राष्ट्रपतीपदाची निवडणूक 20 जुलैला होणार असल्याचं म्हटलं जात आहे. (sri lanka economic crisis protesters besiege president ranil wickremesinghe pm house live telecast stopped)

दुसऱ्या बाजूला श्रीलंकेतील राजकीय आणि आर्थिक संकटाचा सर्वाधिक परिणाम हा आरोग्य व्यवस्थेवर झाला आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की,  डॉक्टर रुग्णांना आजारी न पडण्याचा सल्ला देत आहेत. श्रीलंकेत औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे.

सध्या रनिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाची जबाबदारी ही रनिल विक्रमसिंघे यांच्याकडे देण्यात आली आहे. विक्रमसिंघे यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. पश्चिम श्रीलंकेत कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच अधिकृत वृत्तवाहिनी SLRC नेही थेट प्रक्षेपण बंद केलं आहे.
 
श्रीलंकेला अन्न आणि इतर मुलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी आर्थिक संघर्ष करावा लागत आहे. यासर्व अडचणी असताना श्रीलंकेला औषधांचीही उणीव भासतेय. काही डॉक्टर स्वत: पुढाकार घेऊन निधीसाठी सोशल मीडियावर आवाहन करत आहेत. तसेच देशाबाहेर असणाऱ्या श्रीलंकेतील नागरिकांनाही मदतीचं आवाहन केलंय.

लवकरच नवा राष्ट्रपती 

गोटाबाया यांनी आजच राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. सभापती अभयवर्धने यांना गोटबाया यांनी आज संध्याकाळपर्यंत पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगिलं की 20 जुलैपर्यंत संसदेत देशाच्या नव्या राष्ट्रपतीची निवड केली जाईल. देशातील सातत्याने घडामोडी पाहता विक्रमसिंघे यांना काळजीवाहू राष्ट्रपती करण्यात आलं आहे.

वृत्तवाहिन्यांवरुन प्रसारण बंद

या सर्व घटनांमुळे अधिकृत वृत्तवाहिनी श्रीलंका रुपवाहिनी कॉर्पोरेशन (SLRC) नेही लाईव्ह टेलिकास्ट बंद केलंय. आंदोलकांनी चॅनेलच्या परिसरात घेराव घातला होता. यानंतर हा निर्णय घेण्यात आला.