रिपोर्टिंगदरम्यान महिला पत्रकाराकडून विचित्र कृत्य, ज्यामुळे आलीय चर्चेत... पाहा हा ViralVideo

या व्हिडीओनंतर काही यूजर्सने या महिला पत्रकाराला चांद नवाबचा लेडी वर्जन म्हटलं आहे. 

Updated: Jul 13, 2022, 04:43 PM IST
रिपोर्टिंगदरम्यान महिला पत्रकाराकडून विचित्र कृत्य, ज्यामुळे आलीय चर्चेत... पाहा हा ViralVideo title=

ViralVideo : पाकिस्तान पत्रकार म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? पाकिस्तानी पत्रकार चांद नवाब आठवतो ना. ईद असली की त्यांचा जुन्या व्हिडीओ लोक वारंवार पाहतात. आता अजून एका पाकिस्तानच्या पत्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजतोय. नुकत्याच झालेल्या ईद उल अजहाचा रिपोर्टिंगच्या वेळी या पाकिस्तानी महिलेने जो काही कारनामा केला त्यानंतर सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. 

काय केलं या महिला पत्रकाराने?

'बजरंगी भाईजान' चित्रपटातील चांद नवाब हे पात्र खूप गाजलं होतं. त्यानंतर ओरिजनल चांद नवाबचा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरला होता. ही महिला पत्रकार पण रिपोर्टिंग करत असताना अचानक जे काही घडलं त्यानंतर तिने केली बातमी नाही तर, ती जगभरात प्रसिद्ध झाली. ही महिला पत्रकार लोकांच्या जमावात उभी राहून ईदचा आनंद कसा साजरा होतोय याचं रिपोर्टिंग करत होती. तेव्हा तिची नजर त्या जमावात बाजूला उभा असलेल्या मुलाकडे जाते. जसं ती आपलं रिपोर्टिंग संपवते आणि त्या मुलाच्या कानाखाली लगावते. झालं असं की, ही पत्रकार लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना या मुलाचा हात सतत तिच्या आणि कॅमेरासमोर येत होता. त्यामुळे तिला राग अनावर झाला आणि तिने या मुलाच्या कानशिलात लावली. 

चांद नवाबची लेडी वर्जन

सोशल मीडियावर महिला पत्रकाराचा व्हिडीओ यूजर्सकडून व्हायरल होतोय. महिला पत्रकारच्या या कृत्याबद्दल काही यूजर्स विरोध करत आहेत. तर काही लोकं तिचा या कृत्याचे समर्थन करत आहेत. काही लोकं तर कनफ्यूज आहेत, ते म्हणतात, ''नक्की त्या मुलाला महिला पत्रकाराने का मारलं?'' काही यूजर्सचं म्हणं होतं की, ''त्या मुलाने बदमाशी केली होती.'' तर काही यूजर्सचं म्हणं आहे की, ''अशाप्रकारच हिंसात्मक कृत्य योग्य नाही.'' विशेष म्हणजे या व्हिडीओनंतर काही यूजर्सने या महिला पत्रकाराला चांद नवाबचा लेडी वर्जन म्हटलं आहे. तर एक यूजर म्हणतो ''ईदचा आनंद हाणामारीशिवाय येत नाही.''