मृत्यू होऊन 70 वर्ष झाली, तरी आजही लोकांना जीवनदान देतेय ही महिला... हे कसं शक्य?

जेव्हा ती मरण पावली त्यावेळी ती फक्त 31 वर्षांची होती.

Updated: Oct 20, 2021, 12:58 PM IST
मृत्यू होऊन 70 वर्ष झाली, तरी आजही लोकांना जीवनदान देतेय ही महिला... हे कसं शक्य? title=

मुंबई : सुमारे 70 वर्षांपूर्वी एका तरुणीचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू झाला. तिच्या उपचारादरम्यान डॉक्टरांनी गुप्तपणे तिची एक सेल काढून घेतली. यानंतर त्या पेशीचा अभ्यास करून विविध रोगांवर औषध तयार केले गेले. ज्यामुळे जगातील लाखो लोकांचे प्राण वाचू शकले आहे. WHO चे चीफ Dr Tedros Adhanom Ghebreyesus यांनी Henrietta Lacks हिला सन्मानीत करण्यात आलं आहे. Henrietta Lacks 70 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 1951 मध्ये मृत्यू झाला. परंतु त्याच्या शरीरातून परवानगीशिवाय काढलेला पेशी आजही लाखो लोकांचे प्राण वाचवत आहे. हेन्रीएटाच्या वतीने हा पुरस्कार त्यांचा 87 वर्षांचा मुलगा लॉरेन्स लॅक्सने स्वीकारला.

डब्ल्यूएचओच्या डॉक्टरांनी त्याचा सन्मान करताना सांगितले की, मी मान्य करतो की हेनरीएटावर पूर्वीच्या वर्षांमध्ये वैज्ञानिकदृष्ट्या अन्याय झाला होता. तिच्या काळ्या रंगामुळे आणि एक स्त्री असल्याने तिला पुरेसा आदर दिला गेला नाही. तर मानवता वाचवण्यासाठी आणि वैद्यकीय विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे खूप महत्वाचे योगदान होते.

डीएनएच्या अहवालानुसार, हेन्रीएटा लॅक्स पती आणि 5 मुलांसह आनंदी होती. एक दिवस तिच्या योनीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यासाठी तिने पतीसह जॉन हॉपकिन्स विद्यापीठ गाठले आणि तिथे ती अॅडमीट झाली. तपासणी केली असता तिला गर्भाशयाचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले.

डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण 4 ऑक्टोबर 1951 रोजी तिचा मृत्यू झाला. जेव्हा ती मरण पावली त्यावेळी ती फक्त 31 वर्षांची होती.

डॉक्टरांनी न विचारता पेशी बाहेर काढली

हेन्रीएटावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तिच्या ट्यूमरचे काही नमुने घेतले. या दरम्यान, ट्यूमरमधून 'हेला' पेशी काढून टाकण्यात आल्या. यासाठी रुग्ण किंवा तिच्या पतीकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. यानंतर, तो सेल प्रयोगशाळेत विकसित करण्यात आला.

मग कुटुंबाची परवानगी न घेता, त्या पेशीचे लॅबमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून विकले गेले. जगभरातील पेशींवरील अभ्यासासाठी 500 दशलक्ष मेट्रिक टन 'हेला' पेशी विकल्या गेल्या.

हा 'हेला' सेल लोकांचे प्राण वाचवण्याचा रामबाण उपाय ठरला. या सेलचा अभ्यास करून, जगभरातील शास्त्रज्ञ एचपीव्ही लस, पोलिओ लस, एचआयव्ही/एड्सवर औषध, हिमोफिलिया, रक्ताचा आणि पार्किन्सन रोगांवर औषध बनवू शकले. यासह, कर्करोग, जीन मॅपिंग, आयव्हीएफ सारख्या उपचार पद्धतींच्या विकासालाही वेग आला. ज्याचा वापर करून आतापर्यंत जगात लाखो लोकांचे प्राण वाचले आहेत.