मुंबई : पूर्वीच्या काळापेक्षा मुलींच्या कपड्यांची स्टाईल आता इतकी बदलली आहे की, ते पुरुषांप्रमाने कपडे घालू लागले आहेत. एवढंच काय तर मुली आता स्लीव्हलेस टॉप किंवा शॉर्ट पॅन्ट घालून देखील फिरु लागल्या आहेत. भारतात किंवा वेस्टन कंट्रीमध्ये हे आता कॉमन किंवा नेहमीचंच झालं आहे. परंतु शॉर्ट्स आणि स्लीव्हलेस टॉप घातल्यामुळे एका १३ वर्षीय मुलीला तरुणीला बसमध्ये एन्ट्री दिली नाही.
रिपोर्टनुसार या मुलीला अकिवा ते बिन्यामिना-गिवत अडा असा प्रवास करायचा होता. अशा परिस्थितीत ती 9 क्रमांकाच्या बसची वाट पाहत होती. बस थांबल्यावर ड्रायव्हरने तिच्या कपड्यांकडे पाहिले आणि तिला स्वतःला झाकण्यासाठी काही आहे का? असे विचारले.
यानंतर मुलीने ड्रायव्हरला सांगितले की, तिच्याकडे आणखी कपडे नाहीत, तेव्हा चालकाने तिला बसमध्ये चढण्यास नकार दिला. मुलीने सांगितले की, ''हे ऐकून मला धक्काच बसला. नक्की काय झालं हे मला समजलेच नाही. त्यामुळे मी बस खाली उतरले. परंतु नंतर मला ड्रायव्हरला मी काहीच बोलू शकले नाही, याचा पश्चाताप झाला. मला वाटत नाही की मुलांना अशी वागणूक दिली जात असेल, मग मुलींसाठीचं असं का?''
या मुलीच्या आईने आता नॅशनल पब्लिक ट्रान्सपोर्ट अथॉरिटीकडे ड्रायव्हरविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मुलीच्या आईने सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी तिचे वर्तन हा आपल्या सर्वांच्या मूलभूत हक्कांवर आणि विशेषत: मानवी प्रतिष्ठेच्या विरोधात गंभीर गुन्हा आहे. त्यांनी सांगितले की, आपल्या मुलीला पूर्ण समानतेचे महत्त्व शिकवून मोठे केले आहे. तिला काय घालायचे हे कोणीही सांगू शकत नाही.
या घटनेबाबत कविम बस कंपनीने चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. चालकाने कंपनीच्या धोरणांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
यासोबतच कंपनीने आपल्या चालकांना कोणत्याही प्रवाशाला त्यांची सेवा वापरण्याची परवानगी देण्याच्या सूचना दिल्या आहेत.