लंडन : लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर येत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ हे आपल्याला इमोशनल करणारे असतात. परंतु सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो सर्वांसाठीच धक्कादायक आहे. जो पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. कारण या नवरा-नवरीने स्वतःलाच आग लावून पेटवून घेतलं आहे. ज्यामुळे हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. लग्नात आलेले पाहुणेही देखील हे सगळ घडताना पाहातच राहिले.
खरंतर हा एक वेडिंग शुट स्टंट आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की नववधू आणि नवरदेव एकमेकांच्या हातात हात घालून उभे आहेत. हे पाश्चिमात्य कपल असल्याने नववधूने सुंदर असा सफेद रंगाचा वेडिंग गाऊन घातला आहे, तर नवर देवाने सुट घातला आहे.
तसेच नववधूच्या हातात फुलांचा गुच्छा आहे. ज्याला आधी आग लावली जाते, त्यानंतर नववधू आणि नवरदेवाला देखील पाठीमागून आग लावली जाते. खरंतर हे सगळं त्यांनी वेडिंग फोटो शुटसाठी केलं. ज्यामुळे उपस्थीत पाहूणे देखील हे सगळं पाहातच राहिले.
परंतु या लोकांनी असा वेडेपणा केलाच का? असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात उपस्थीत झाला असावा.
खरंतर एक एक हौस म्हणून या दोघांनी स्वत:ला पेटवून घेतलं कारण त्यांना आपल्या लग्नात हटके काहीतरी करायतं होतं, ज्यामुळे सगळेच लोक त्याचं लग्न नेहमीच लक्षात ठेवतील.
या नववधू आणि नवरदेवानं स्वत:ला अशा पद्धतीने आग लावून घेतली आणि आपल्या लग्नातून सगळ्यांना निरोप घेतला, म्हणजेच एक्झिट घेतली.
या दोघांनी हंगर गेम्स नावाच्या फिल्ममधील सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यासाठी या दोघांनीही फायर प्रुफ वेडिंग ड्रेस घातला तसेच शरीरावर अँटी बर्न जेल लावलं होतं आणि फोटो शुट झाल्यानंतर त्यांनी फायर एक्सटीन्गुइशेरजवळ जाऊन आपल्या कपड्यांची आग विझवून घेतली.
हे दोघे ही प्रोफेशनल स्टंट्समन आहेत आणि दोघांनीही तज्ज्ञांच्या उपस्थितीत हा स्टंट केला होता. त्यामुळे या लोकांनी प्रसिद्धीसाठी काहीही केलं असलं, तरी तुम्ही असा स्टंट चुकूनही करु नका.
djrusspowell नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्याला लोक शेअर आणि लाईक करत आहे. अनेकांना या दोघांचंही वागणं मुर्खपणाचं आणि जीवघेणं वाटलं आहे.