पॅरीस : फ्रान्सची राजधानी पॅरीसमध्ये लोक एका भलत्याच प्रकारामुळे संतापलेले आहेत. हा संताप नेहमीच्या संतापापेक्षा काहीसा वेगळ्या कारणासाठी आहे. हे कारण म्हणजे शहरातील वेश्यालयातील खोल्यांमध्ये असलेल्या सिलिकॉन सेक्स डॉल. खास करून या वेश्यालयांकडे पुरूष आकर्षित होत आहेत. तसेच, त्याचा वापरही करत आहेत. त्यामुळे शहरात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली असून, काही संघटनांनी हा प्रकार तत्काळ बंद करावा अशी मागणी केली आहे.
टेलिग्राफ युकेने दिलेल्या वृत्तानुसार, या नव्या वेश्यालयातील अनुभुतीसाठी ग्राहकांना प्रतितासासाठी ८० पौंड म्हणजेच ७ हजार ३७० रूपये मोजावे लागतात. फ्रान्समध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. दरम्यान, या जागेला 'गेम्स सेंटर' असे नाव देण्यात आले असून, हे वेश्यालय नसल्याचे चालकांनी म्हटले आहे. मात्र, या धक्कादायक प्रकाराच विरोध करणाऱ्या संस्था, संघटनांनी हे वश्यालयच असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, फ्रान्समध्ये वेश्यालय उघडने किंवा ते चालवणे कायद्याने गुन्हा आहे. दरम्यान, अशा प्रकारे कथीत वेश्यालय चालवणाऱ्या व्यक्तिचे म्हणने असे की, याचे बुकिंग ऑनलाईन पद्धतिने होते. तसेच, शेजारील लोकांनाही याची माहिती कळत नाही की, आत काय चालले आहे. दरम्यान, या सेवेचा फायदा घेणाऱ्यांमध्ये ३० ते ५० वर्षे वयोगटातील पुरूषांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, अशा प्रकारच्या वेश्यालयांना विरोध करणाऱ्यांचा दावा असा की, हा प्रकार म्हणजे महिलांच्या प्रतिमेवर डाग लावण्याचा प्रकार आहे.
प्राप्त माहितीनुसार, २०१६पर्यंत फ्रान्समध्ये वेश्याव्यवसाय कायदेशीर होता. मात्र, फ्रान्सच्य राष्ट्रीय संसदेत पारीत झालेल्या कायद्यानुसार या व्यवसायावर बंदी घालण्यात आली आहे. असा प्रकार करताना कोणी आढळले तर, वेश्येकडे ग्राहक म्हणून जाणाऱ्या व्यक्तिकडून दंडापोटी मोठी रक्कम वसूल केली जाते.