पुढील आठवड्यात सौदीला मिळणार नवा किंग - रिपोर्ट

सौदी अरबचा किंग लवकरच आपल्या मुलाला उत्तराधीकारी ठरवून गादी सोपवण्याची घोषणा करू शकतो. शाही घराण्याच्या एका जवळच्या सूत्रांनी डेली मेलला याबाबत माहिती दिली.

Updated: Nov 17, 2017, 12:42 PM IST
पुढील आठवड्यात सौदीला मिळणार नवा किंग - रिपोर्ट title=

रियाद : सौदी अरबचा किंग लवकरच आपल्या मुलाला उत्तराधीकारी ठरवून गादी सोपवण्याची घोषणा करू शकतो. शाही घराण्याच्या एका जवळच्या सूत्रांनी डेली मेलला याबाबत माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, प्रिन्स मोहम्मद बिन सलमान देशाचा नवा राजा होईल. ३२ वर्षीय प्रिन्स सलमानची सत्तेवर पकड मजबूत होण्यासाठी हे अंतिम पाऊल असेल. नुकतेच त्यांनी भ्रष्टाचार प्रकरणी ४० पेक्षा जास्त प्रिन्स आणि मंत्र्यांना अटक करण्याचा आदेश दिला होता.

सूत्रांनी सांगितले की, किंग सलमान आता पारंपारिक पद्धतीने देशाचे प्रमुख राहतील. अधिकृतरित्या देशाची सत्ता त्यांच्या मुलाच्या हाती येईल. जर सगळंकाही ठिक झालं तर किंग सलमान आपला मुलगा MBS ला सौदी अरबचा किंग घोषित करतील. किंग सलमान त्यानंतर इंग्लंडच्या महाराणीसारख्या भूमिकेत येतील. ते केवळ पवित्र धार्मिक स्थळांचे संरक्षक बनतील’.

उच्च पदावरील सूत्रांनी सांगितले की, किंग बनल्यानंतर प्रिन्स सलमान इराणवर आपलं लक्ष केंद्रीत करतील, ज्यांच्यासोबत ब-याच काळापासून सौदी अरबचं भांड्ण सुरू आहे. असा अंदाज व्यक्त केला जातोय की, लष्करी कारवाई सुद्धा केली जाऊ शकते.