आधी कानाखाली जाळ, नंतर जेवण; 'या' हॉटेलमध्ये मार खाल्ल्याशिवाय जेवणच मिळत नाही

चमचमीत पदार्थ खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो. खाद्यपदार्थांसाठी पैसे देतो. मात्र जपानमध्ये एक असं हॉटेल आहे जिथं चक्क खाण्यापूर्वी सणसणीत कानाखाली दिली जाते. बसला ना आश्चर्याचा धक्का, मात्र हे अगदी खरंय...बरं इथं ग्राहकांच्या कानाखाली का दिली जाते, काय आहे हा सगळा प्रकार जाणून घेवूया. 

Updated: Dec 31, 2023, 08:21 PM IST
 आधी कानाखाली जाळ, नंतर जेवण; 'या' हॉटेलमध्ये मार खाल्ल्याशिवाय जेवणच मिळत नाही title=

Sahi Kiya Slapping Restaurant Japan : चमचमीत पदार्थ खायला कुणाला आवडत नाही. अगदी व्हेजपासून ते नॉनव्हेजपर्यंत चांगल्या चांगल्या डिशेसचा आस्वाद घेण्यासाठी आपण हॉटेलात जातो. चांगल्या सर्व्हिसबद्दल वेटरला टीपही देतो. मात्र जपानमधल्या रेस्टॉरंटची अजब त-हा आहे. इथे वेटर गालावर चापट मारून ग्राहकांचं स्वागत करतात. 

इथं चक्क ग्राहकांच्या कानाखाली दिली जाते. गालावर चापट मारून आलेल्या ग्राहकांचं स्वागत केलं जातं. जपानमधल्या नागोयातील या हॉटेलचं नाव आहे साशिहोकोया-या...इथं येऊन गालावर चापट खाण्यासाठी ग्राहक उतावीळ असतात. अर्थात हा मार फुकट मिळत नाही. त्यासाठीही पैसे मोजावे लागतात. या हॉटेलात आल्यानंतर 300 जपानी येन म्हणजेच 169 रूपये खर्च केल्यानंतर इथल्या वेट्रेस ग्राहकांच्या गालावर चापट मारतात. कधी कधी ही चापट इतकी जोरात असते की ग्राहक खालीही पडतात. तर काही वेट्रेस अगदी प्रेमानं चापट मारत ग्राहकांचं स्वागत करतात.

यामागे एक रंजक कहाणी आहे. खरं तर हे हॉटेल सुरू झालं तेव्हा ते प्रचंड नुकसानीत होतं. ग्राहकांनी हॉटेलकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर मालकानं हॉटेलात महिला वेट्रेसची नेमणूक केली आणि नागोया लेडीज स्लॅप नावाचा मेन्यू सुरू केला. ज्यात या महिला वेट्रेस ग्राहकांच्या गालावर चापट देऊ लागल्या. लोकांना हा प्रकार खूपच आवडला. त्यानंतर इथं येणा-या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. पैसे कमावण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल याचा नेम नाही. जपानी हॉटेल मालकाची ही शक्कल कामी आली आणि हॉटेलची चलती सुरू झाली. तुम्हालाही जर अशी प्रेमाची चापट खायची असेल आणि लज्जतदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर जपानच्या या हॉटेलला एकदा तरी भेट द्या.

ठाण्यातल्या व्हेज कॅन्टीन नावाच्या हॉटेलमध्ये काम करतो रोबोट

ठाण्यातल्या व्हेज कॅन्टीन नावाच्या हॉटेलमध्ये रोबोट वेटर रुजू झालाय. जपानमधून आयात केलेला हा रोबो ग्राहकांकडून खाद्यपदार्थांच्या ऑर्डर घेतो. शिवाय खाद्यपदार्थही वाढून देतो. बेबी डॉल नावाचा हा रोबो जपानहून आणलेला आहे. हा रोबो अगदीच स्मार्ट असल्याचं मालक सांगतात. हा रोबो ग्राहकांच्या ऑर्डर घेताना कोणताही गोंधळ करत नाही. शिवाय कामाच्या तासांबाबतही त्याची कोणतीच तक्रार नाही. या रोबोटला पाहण्यासाठी ठाणेकर गर्दी करतायत. पूनम मौर्य यांनी आठ लाखांत हा रोबो खरेदी केलाय.