Russia Ukraine war : जे कोणाला जमलं नाही, ते कोणी करुन दाखवलं? रशियाला दाखवली बाहेरची वाट

रशिया हा एक शस्त्रास्त्र सुसज्ज देश असल्यामुळं अनेक राष्ट्र त्याच्या विरोधात गेलेले नाहीत

Updated: Mar 1, 2022, 03:55 PM IST
Russia Ukraine war : जे कोणाला जमलं नाही, ते कोणी करुन दाखवलं? रशियाला दाखवली बाहेरची वाट  title=

नवी दिल्ली : सध्या रशिया आणि युक्रेन या दोन्ही राष्ट्रांमध्ये संघर्ष सुरु असल्यामुळं संपूर्ण जगातून भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही भीती आण्विक युद्धामध्ये बदलणार नाही, हीच चिंता सर्वांना लागून राहिली आहे. रशिया हा एक शस्त्रास्त्र सुसज्ज देश असल्यामुळं अनेक राष्ट्र त्याच्या विरोधात गेलेले नाहीत. किंबहुना रशियाबाबतच्या भारताच्या भूमिकेवरूनही काही तज्ज्ञांनी नाराजीचा सूर आळवला आहे.

असं असताना जे अनेकांना जमलं नाही, ते फिफा आणि आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन अर्थात IIHF नं करुन दाखवलं आहे.

रशिया आणि बेलारुसला IIHF नं सस्पेंड केलं आहे. परिणामी यापैकी कोणताही संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. रशिया 2023 मध्ये जागतिक स्पर्धेचं यजमानपद भूषवणार होता.

आता मात्र परिस्थिती बरीच बदलली आहे. युक्रेनवर रशियानं केलेला हल्ला पाहता या युद्धाचे थे परिणाम क्रीडा जगतावर झाले आहेत.

ज्यामुळं रशियातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांतून बाहेरची वाट दाखवण्यात आली आहे. तर, बेलारूस रशियन लष्कराला आधार देत आहे.  ज्यामुळं या देशालाही फटका बसला आहे.

शांततेच्या मार्गानं सोडवा तिढा

आयआयएटएफचे अध्यक्ष ल्यूक टार्डिफ यांनी युद्धाचे फोटो धक्का देणारे असल्याची प्रतिक्रिया दिली. हा संघर्ष शांततेच्या मार्गानं निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त करत हिंसेला दुजोरा न देता हा प्रश्न सोडवण्यासाठी इच्छा व्यक्त केली.

कोणकोणत्या संघटनांची रशियावर नाराजी ?

फिफा (Fifa) आणि युईएफए (UEFA) नं रशियाला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निलंबित केलं आहे. ज्यानंतर आता हॉकी फेडरेशननंही रशिया आणि बेलारुसवर नाराजी व्यक्त केली आहे. आता प्रश्न असा, की इतकं सगळं करुन हा संघर्ष नेमका कधी थांबणार ?