युद्धात रशिया जिंकली तरी विजयाचा आनंद टिकणार नाही, कारण...

रशियानं वाजवली विजयाची तुतारी, मात्र युक्रेन पडणार रशियावर भारी 

Updated: Mar 1, 2022, 09:02 PM IST
युद्धात रशिया जिंकली तरी विजयाचा आनंद टिकणार नाही, कारण... title=

Russia Ukrain War : रशियन सैन्यानं युक्रेनच्या राजधानीला चारही बाजुंनी घेरलं आहे. रशिया लवकरच युक्रेनवर कब्जा करेल अशी स्थिती आहे. विजयानंतर रशिया याठिकाणी आपल्या मर्जीतलं सरकार बसवू शकते. मात्र रशियाची हीच रणनीती त्यांना महागातही पडू शकते. 

याचं कारण आहे युक्रेनियन जनतेचा रशियाला असलेला विरोध. पूर्व आणि पश्चिम भागात युक्रेनची विभागणी झाली आहे. पुर्वेकडे रशियन भाषा बोलणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तिथले लोक रशियाच्या हातातील बाहुलं असलेल्या सरकारचं समर्थन करतील. मात्र दुसरीकडे पश्चिमेतील कडव्या युक्रेनियन्सकडून त्यांना कडाडून विरोध होऊ शकतो. हीच अस्थिरता रशियासाठी डोकेदुखी ठरू शकते. 

सध्याच्या घडीला 75 टक्के युक्रेनियन जनता ही मुलनिवासी आहे. एका सर्वेनुसार 2008 मध्ये 9 % युक्रेनियन रशियाविरोधात होते. 2021 मध्ये 50 %हून अधिक लोक रशियाचा तिरस्कार करायला लागली. युद्धानंतर हा आकडा 80% पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभाविकच नव्या सरकारला असंतोषाचा तीव्र सामना करावा लागेल.

युद्धानंतर युरोपियन देशांनी लादलेले प्रतिबंध रशियासाठी महागात पडू शकतात. अशातच युक्रेनमधील बाहुलं सरकार पुतीन यांच्यासाठी अडचणी वाढवू शकतं. त्यामुळे या युद्धानं रशियाला विजय जरूर मिळेल. मात्र विजयाचा आनंद फार काळ टिकणार नाही एव्हढं नक्की.