युक्रेनवर हल्ला करण्याची रशियाची पूर्ण तयारी, भारतीयांना देश सोडण्याची सूचना

Russia threat Ukraine : युक्रेन आणि रशियामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमध्ये इतका टोकाचा वाद विकोपाला गेला आहे की, युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत. दरम्यान, युक्रेनवर हल्ला करण्याची रशियाने पूर्ण तयारी सुरु केली आहे. 

Updated: Feb 16, 2022, 09:50 AM IST
युक्रेनवर हल्ला करण्याची रशियाची पूर्ण तयारी, भारतीयांना देश सोडण्याची सूचना title=

लंडन : Russia threat Ukraine : युक्रेन आणि रशियामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमध्ये इतका टोकाचा वाद विकोपाला गेला आहे की, युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत. दरम्यान, युक्रेनवर हल्ला करण्याची रशियाने पूर्ण तयारी सुरु केली आहे. त्यामुळे भारताने आपल्या नागरिकांना युक्रेन सोडावे, अशा सूचना केल्या आहेत. (Russia ready to Attack on Ukraine, Government asks Indians to leave Ukraine amid Russia threat)

युक्रेनमधील भारतीयांनी तातडीने युक्रेन सोडावे, अशा सूचना भारतीय दुतावासाने केल्या आहेत. अत्यावश्यक असेल तरच युक्रेनमध्ये राहावे. शिवाय जे युक्रेनमध्ये राहतील त्यांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि वास्तव्याची माहिती दुतावासाला द्यावी, असेही सांगण्यात आले आहे. युक्रेनवर हल्ला करण्याची पूर्ण तयारी रशियाने केली आहे.

युक्रेनच्या सीमेवर रशियाचे हवाईदल, नौदलही सज्ज आहे. चर्चेची कोणतेही शक्यता राहीली नसल्याने प्रत्यक्ष युद्ध कधीही सुरुवात होऊ शकते. त्यामुळे दुतावासाने भारतीयांना हे आदेश दिले आहेत. दरम्यान युद्धजन्य परिस्थीतीही भारतीय दुतावासाचं काम सुरुच राहणार आहे.

या देशांनी आपल्या नागरिकांना माघारी बोलावले

भारताने युक्रेनमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना माघारी बोलावले आहे. भारताने युक्रेनमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना परत येण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्यांना भारतातून युक्रेनला जायचे आहे, त्यांनी अद्याप युक्रेनला न जाण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलनेही युक्रेनमधून आपल्या नागरिकांना एअरलिफ्ट करण्याची तयारी पूर्ण केली आहे. अमेरिकेनेही आपल्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचे आवाहन केले आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा यांसारखे देश युक्रेनची राजधानी कीव येथून लेव्ह येथे आपले वाणिज्य दूतावास हलवत आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभाग पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांना रशियाच्या हल्ल्याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी याला दुजोरा दिलेला नाही तसेच नाकारलेला नाही.