मुंबई : आई होणं हे प्रत्येक मुलं स्वप्न असतं. पण सध्याचा स्पर्धेच्या युगात महिला करिअरला जास्त महत्त्वं देताना दिसतात. उशीरा लग्न करणं आणि त्यानंतर अनेक वर्षांनी एखादं मुलं. आपल्याला अजच्या युगात क्वचितच असं जोडपं दिसतं, ज्यांना दोन मुलं असावीत. बरं आता, लोकांचं जाऊ द्या तुम्हाला स्वत:ची किती मुलं असावीत असं वाटंय? तुमचं उत्तर कदाचित एक, दोन किंवा जास्तीत जास्त तीन म्हणाल परंतु एका तरुणीनेनं तर हद्दंच पार केली आहे.
सोशल मीडियावर एक 23 वर्षांची तरुणी खूप व्हायरल होत आहे. जिने चक्कं 11 मुलांना जन्म दिला आहे. हो इतक्या कमी वयात या तरुणीनं 11 मुलांना जन्म दिला आहे.
इतक्या कमी वयात येवढी मुलं कशी होऊ शकता, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? सरोगसीच्या माध्यमातून या तरुणीने या मुलांना जन्म दिला आहे आणि तिच्या या निर्णयात तिच्या नवऱ्याची साथ आहे.
वयाच्या 17 व्या वर्षी ती पहिल्यांदा आई झाली. तेव्हा तिचं लग्न झालं नव्हतं. मात्र काही वर्षांनी तिच्या आयुष्यात एक व्यक्ती आला. पाहताच क्षणी ती त्याचा प्रेमात पडली. तिने त्याला सांगितलं मला खूप सारी मुलं हवी आहे.
तिचा हा निर्णय ऐकून तिने आपण सरोगसीद्वारे एकाच वेळी आपण अनेक मुलांना जन्म देऊ शकतो, असा सल्ला दिला. हे ऐकताच तिने सरोगसीद्वारे आतापर्यंत 11 मुलांना जन्म दिला.
क्रिस्टीना असं या तरुणीचं नाव आहे. तिचा 56 वर्षीय कोट्याधीश नवरा एक सुपर वडील आहे. या दोघांनी मुलांचं संगोपन करण्यासाठी कामं वाटून घेतली आहेत. क्रिस्टीनासोबत मुलांना सांभाळण्यासाठी नॅनी आणि काही कर्मचारी ठेवण्यात आले आहेत.
क्रिस्टीना आणि तिचा नवरा मुलांना क्वॉलिटी टाइम देतात. गंमत म्हणजे या दोघांनी अजून किती मुलं हवे आहेत याचा आकडा त्यांनी निश्चित केलेला नाही