भविष्यातील 6000 वर्षांनंतरचे जग पाहून 2023 या वर्षात परत आला; टाईम ट्रॅव्हलरने केलेल्या अविश्वसनीय दाव्यामुळे खळबळ

 भविष्यातील तब्बल 6 वर्ष मागे आल्याचा दावा एका टाईन ट्रॅव्हलरने केला आहे.  टाईम मशीन मधून प्रवास करत भविष्याचा वेध घेणे किंवा भतकाळात डोकावणे या साऱ्या कल्पना आपण फक्त चित्रपटांमध्ये पाहतो. मात्र एका व्यक्तीने टाईम ट्रॅव्हल केल्याचा दावा केला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 9, 2023, 11:10 PM IST
भविष्यातील 6000 वर्षांनंतरचे जग पाहून 2023 या वर्षात परत आला; टाईम ट्रॅव्हलरने केलेल्या अविश्वसनीय दाव्यामुळे खळबळ title=

Time travel : टाईम ट्रॅव्हल(Time travel)  ही संकल्पना काल्पनिक असल्याचा दावा केला जात आहे.  टाईम मशीन मधून प्रवास करत भविष्याचा वेध घेणे किंवा भतकाळात डोकावणे अशी ही टाईम ट्रॅव्हलची संकल्पना आहे. टाईम ट्रॅव्हलच्या संकल्पनेवर आधारीत अनेक चित्रपट बनले आहेत. आता मात्र, एका व्यक्तीने 6000 वर्षांनंतरचे जग पाहून 2023 या वर्षात परत आल्याचा दावा केला आहे. इतकचं नाही तर, 6000 वर्षानंतर जगात काय बदल होतील याबाबत केलेल्या दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे. 

जगभारत अशी अनेक रहस्य आहेत. शास्त्रज्ञांना अद्याप ज्याचा उलगडा शास्त्रज्ञांना देखील झालेला नाही. त्यातच अनेक  टाईम ट्रॅव्हलर असल्याचा दावा करतात. यामुळे वैज्ञानिक देखील अचंबित होतात. मिररने अशाच एका टाईम ट्रॅव्हलरबाबतचे वृत्त दिले आहे. या टाईम ट्रॅव्हलरने भविष्यातील सन  3977 म्हणजेच 6000 वर्षानंतर जग पाहून  परत आल्याचा दावा केला आहे. या व्यक्तीने ApexTV वर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती सन 6000 वर्षानंतरचे जग पाहून 2023 मध्ये परत आल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओमध्ये या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. तसेच त्याचा आवाज देखील अत्यंत विचित्र आहे.

 6000 वर्ष पाहून परत आलेल्या टाईम ट्रॅव्हलरने केले खळबळजनक दावे

6000 वर्ष पाहून परत आलेल्या टाईम ट्रॅव्हलरने  खळबळजनक दावे केले आहेत. या काळात कृत्रीम बुद्धीमत्ताचे वापर केला जाईल असे या  टाईम ट्रॅव्हलरचे म्हणणे आहे. 1990 च्या दशकात तयार करण्यात आलेल्या गुप्तचर योजनेचा आपण एक भाग असल्याचे या टाईम ट्रॅव्हरलचे म्हणणे आहे.  लोकांना भविष्यात पाठवण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली होती असा दावा देखील त्याने केला आहे. 3977 वर्षांनंतर लोक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात जगतील. येथील सरकार AI टेक्नॉलॉजीवर काम करेल, औषधे आधुनिक जीवन जुन्यासारखे बनविण्याचे काम करतील. वॉटर कलर पेंटिंगसारखे दिसणारे शहराचे चित्र देखील त्याने दाखवले. मात्र, या प्रवासा दरम्यान काही मित्र भविष्यात अडकले आहेत, ते वर्तमानात परत येऊ शकले नाहीत आणि ते कधीही परत येऊ शकणार नाहीत असे सांगाताना या व्यक्तीला रडू कोसळले. भविष्यात मानव टाईम ट्रॅव्हलर बनू शकतो असे दावा देखील या व्यक्तीने केला आहे.